Breaking News

माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये ठामपाने पटकाविला तिसरा क्रमांक

माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये ठामपाने पटकाविला तिसरा क्रमांक

महापौर शर्मिला पिंपळोलकर आयुक्त सौरभ राव पुरस्कार स्वीकारणार

ठाणे (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान ५.०" (कालावधी १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५) अंतर्गत अमृत गटात १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या गटामध्ये ठाणे महापालिकेला तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण आज २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वा. डोम, सरदार वल्लभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वितरीत केला जाणार आहे. हा पुरस्कार स्वकिरण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित राहणार आहे.

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ५.०” या अभियान कालावधीत ठाणे महापालिकेने पर्यावरण संवर्धनासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. भुमी घटकांतर्गत ८१,७३४ झाडांची लागवड, ९९ नवीन हरित क्षेत्रांची निर्मिती, ७२९ हेरिटेज वृक्षांची नोंद व सर्वेक्षण, तसेच कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी मोहिम प्रभावीपणे राबविण्यात आली. जैववैद्यकीय, ई-कचरा व उऊकचऱ्याचे मोठ्या प्रमाणात संकलन व पुनर्चक्रिकरण केले. वायू घटकांतर्गत हवेच्या गुणवत्तेचे पाच ठिकाणी नियमित निरीक्षण, हरित फटाक्यांबाबत जनजागृती, बांधकामांवरील प्रदूषण नियंत्रण उपाययोजना तसेच उष्णता प्रतिकारकता व पूर कृती आराखडा तयार करण्यात आला. जल संवर्धनांतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग, मलजल प्रक्रिया प्रकल्पांची कार्यक्षमता, विहिरींचे पुनरुत्लीवन आणि तलाव संवर्धनासाठी विविध उपाययोजना राबविल्या. अग्नी घटकांतर्गत एलईडी पथदिवे, ई-बस सेवा, ईव्ही चार्जिंग स्टेशन, सोलार रूफटॉप आणि सोलार वॉटर हिटर यांसारख्या ऊर्जा बचत उपक्रमांची अंमलबजावणी केली.आकाश घटकांतर्गत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर ई-प्रतिज्ञा घेतल्या असून शेकडो जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांच्या आधारे ठाणे महानगरपालिकेने पर्यावरण संरक्षणात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धत तिसरा क्रमांक पटकावला आहे.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...