Breaking News

दि.बा. पाटील नामकरणासाठी २३ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन!

दि.बा. पाटील नामकरणासाठी २३ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन!

भूमिपुत्रांच्या भावनांचा सन्मान राखत तात्काळ निर्णय जाहीर करण्याची मागणी

उरण (वार्ताहर) - नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन आजमितीस पाच महिन्यांचा अवधी उलटला आहे. मात्र तरी या विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणत्याही स्वरूपाचा निर्णय जाहीर होत नसल्याने भूमिपुत्रांमध्ये नाराजीचा सुर कायम आहे. या पार्थभूमीवर सर्वपक्षीय नामकरण कृती समितीच्यावतीने सोमवार दि. २३ फेब्रुवारीपासून आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली. दि.८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उदघाटन झाले होते. त्यानंतर दि.२५ डिसेंबर २०२५ पासून विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, नामकरणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रश्नावर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर व नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक कोपरखैरणे येथील शेतकरी समाज सभागृहात पार पडली. सदर बैठकीत दि.२३ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. समितीच्या वतीने सांगण्यात आले की, विमानतळ ज्या भूमीवर उभा आहे त्या भूमिपुत्रांच्या भावनांचा सन्मान राखत केंद्र सरकारने तात्काळ नामकरणाचा निर्णय जाहीर करावा. अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...