Breaking News

कोपरखेरण्यात रंगणार क्रिकेटचा थरार....

कोपरखेरण्यात रंगणार क्रिकेटचा थरार....

विजेत्या संघाला मिळणार बोकड बक्षीस

कोपरखैरणे(वार्ताहर)-कोपरखैरणेगावात यावर्षी सहयोग मित्र मंडळ आयोजित कै.महेंद्र वेटा (कपुर दा) यांच्या स्मरणार्थ आयोजक प्रयुक्ता मित्र मंडळ, श्री.जय बाळाराम म्हात्रे आणि रेडमुन एजेन्सी यांच्यावतीने व राजेश लालचंद्र वेटा यांच्या सहकार्याने श्री कुलदैवत कुटुंबीय क्रिकेट स्पर्धा होळी चषक २०२६ स्पर्धेचे कोपरखैरण से-२३ येथील भुमिपुत्र मैदानावर सोमवार दि. ०0२ मार्च पासून आयोजन करण्याज आले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून, स्पर्धेत कोपरखैरणे गावातील सर्व कुलदैवत कुटुंबीयातील खेळाडू सहभागी होणार आहेत. याचे वैशिष्टये म्हणजे प्रत्येक कुटुंबीय क्रिकेट संघातील ११ खेळाडूंमध्ये ५०--२ खेळाडू खेळणार आहेत. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे स्पर्धा विजेत्या कुलदैवत कुटुंबीयांना पारितोषिक म्हणून खास करून मोठा बोकड (बकरा) व आकर्षक चषक आणि उपविजेत्या कुलदैवत कुटुंबीयांना छोटा बोकड (बकरा) तसेच तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या कुलदैवत कुटुंबीयांना ६ कोंबड्या असे अनोखे बक्षीस कुलदैवत कुटूंबियांना देण्यात येणार आहेत. प्रयुक्ता मित्र मंडळ आणि रेडमुन एजेन्सी यांच्या माध्यमातून आयोजित या स्पर्धेत एकूण १२ संघ खेळवले जाणार आहेत. प्रत्येक सामना ३ षटकांचा राहणार असून, स्पर्धमध्ये १४४ खेळाडू आपले नशीब आजमावणार आहेत. ही स्पर्धा व्यवस्थित पार पडावी यासाठी आयोजक चंद्रकांत पाटील, विनय वेटा, मनोज वेटा, रूपेश पाटील, दिलीप पाटील, योगेश म्हात्रे, राकेश वेटा, श्रीनिवास पाटील, संदीप पाटील (लालु), शिवाजी जाधव, संजय पाटील, रवि वेटा, विराज वेटा, सुधिर पाटील, राकेश म्हात्रे, ज्ञानेधर पाटील (ज्ञानबा) आणि राजु म्हात्रे आदी ग्रामस्थ खेळाडू विशेष मेहनत घेत असल्याची माहिती अविनाश पाटील यांनी दिली.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...