बेलापूरातील बेकायदा व्यवसायांबाबत कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्यासह अंमलबजावणी करणार! - महापौरांचे आश्वासन

बेलापूरातील बेकायदा व्यवसायांबाबत कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्यासह अंमलबजावणी करणार! - महापौरांचे आश्वासन

बेलापूर (वार्ताहर) - बेलापूर से-१५ व से-११ या परिसरातील बार, लॉजिंग बोडिंग व इतर बेकायदा व्यवसायांवर तात्काळ कारवाई करून ते बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीराम घाटे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांची भेट घेवून एका निवेदनाव्दारे केली होती. या निवेदनाची दखल घेत, महापौर सुजाता पाटील यांनी संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत बोलून लवकरच कायद्याच्या चौकटीत असलेले निर्णय घेण्यासह त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

बेलापूर से-१५ व से-११ या परिसरात पसरलेल्या बार व लॉजींग या बेकायदापणे फोफावलेल्या व्यवसायांबाबत श्रीराम घाटे यांनी प्रभाग क्र.२७ मधील शिवसेनेचे नगरसेवक अमित पाटील यांनाही पत्र सादर केले आहे. से-१५, से-११ या परिसरात सर्व प्रकारचे अनैतिक, असमाजिक व बेकायदेशीर धंदे चालतात. त्यामुळे सदरचे बेकायदा व्यवसाय बंद करण्याची संविधानिक जबाबदारी, मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यावर असल्याचे पत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे सदरचा हा परिसर महापालिका मुख्यालयापासून दीडशे मीटर तसेच बेलापूर कोर्टापासून फक्त ५० मीटर अंतरावर तसेच नगरसेवक कार्यालयापासून २०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे महापालिकेच्या महासभेत आपल्याला वारंवार हा प्रश्न विचारला जाईल की, पुढील पिढीचा विचार करता व महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील स्त्रियांना सन्मान व संरक्षण प्रदान करण्यासाठी लेडीज बार, लॉजिंग बोडिंग व इतर कायद्याने अमान्य व्यवसायाचे ठिकाणी चालणारे इतर बेकायदा धंदे तात्काळ बंद करावेत अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे. उपरोक्त आशयाचे पत्र श्रीराम घाटे यांनी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय व निवडणूक आयोग कार्यालय यांना पाठवले असता, त्यांच्याकडून नवी मुंबई महापालिका आयुक्त यांना या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून कालबाह्यपद्धतीत प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले आहेत. उपरोक्त आशयाचे निवेदन श्रीराम घाटे यांनी महापालिका आयुक्त यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी व नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांच्याकडे वैयक्तिक सादर करत त्यांचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले असता, त्यांनी याप्रकरणी कार्यवाही चालू केली आहे. विशेषत: महापौर सुजाता पाटील यांनी या विषयाचे गांभीर्य तात्काळ ओळखून घेतले व याबाबत घाटे यांचे निवेदन स्विकारून त्या अनुषंगाने संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत बोलून लवकरच कायद्याच्या चौकटीत असलेले निर्णय घेत त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे . याबाबत घाटे यांनी समस्त बेलापूर से-१५ से-११ व विशेषतः महेश बिल्डिंग यांच्यातर्फे महापौरांचे आभार प्रकट केले आहेत. .


Most Popular News of this Week

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

११ जणांच्या मृत्यूनंतर...

कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...

नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...

| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...

खारघरमध्ये डेब्रीज खाली...

खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...