Breaking News

स्विकृत नगरसेवकांसाठी भाजप, शिवसेना उमेदवारांचे अर्ज दाखल...

स्विकृत नगरसेवकांसाठी भाजप, शिवसेना उमेदवारांचे अर्ज दाखल...

बेलापूर (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिकेची यंदाची पाहिली महासभा दि.२० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या महासभेत स्विकृत नगरसेवक, परिवहन समिती सदस्यांसह स्थायी समिती सदस्य व इतर विविध समित्यांचे सदस्य यांची निवड होणार असल्याने या महासभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यानुसार काल भाजप नेते माजी खा.डॉ.संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपतर्फे नवी मुंबई महापालिका स्वीकृत नगरसेवक पदासाठी सहा उमेदवारांनी आपले अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले.

स्विकृत नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये भरत नखाते यांच्यासह कुलदीप सुरी, अमित मेढकर, अँड.अपर्णा गवते, जगजीवन (बंडू) केणी आणि लक्ष्मीकांत पाटील यांचा समावेश आहे. या सर्व ज्येष्ठ व अनुभवी सहकाऱ्यांच्या निवडीमुळे त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा व कार्यकुशलतेचा लाभ शहराच्या प्रगतीसाठी मोलाचा ठरेल असा विश्वास यावेळी संजीव नाईक यांनी व्यक्त केला. नवी मुंबईला आदर्श शहर” बनविण्याच्या ध्येयपूर्तीत ते निश्चितच प्रभावी योगदान देतील असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, माजी महापौर व गटनेते सागर नाईक यांच्यासह भाजप पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेतर्फे द्रारकानाथ भोईर, साहिल चौगुले, सुरेश मिलारे, अंकूश कदम या चौघांनी अर्ज दाखल केले.

परिवहन समितीसाठी भाजपतर्फे १२ उमेदवारांचे अर्ज...

स्विकृत नगरसेवकपदासह परिवहन समिती सदस्य पदासाठी काल भारतीय जनता पक्ष यांच्यावतीने १२ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. यात राजेश राय, राहुल शिंदे, विकास झंजाड, शितल भोईर, रोशन पाटील, राजश्री कातकरी, यशपाल ओव्हळ, कुणाल महाडिक, हनुमंत रोडे, अभिजीत पेडणेकर, कुमारी तीर्था पाटील आणि विनोद म्हात्रे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.


Most Popular News of this Week