पनवेलमध्ये बेशिस्त रिक्षाचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका...
१८० जणांवर कारवाई, ३४ रिक्षा जप्त, १.६८ लाखांचा दंड वसूल
पनवेल (वार्ताहर)-पनवेलमध्ये रिक्षाचालकांच्या बेशिस्तीचा प्रवाशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अशा बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दणका देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पनवेलमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांविरोधातील कारवाईच्या या मोहिमेत एकूण ३५० रिक्षांची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या एकूण १८० रिक्षांवर कारवाई करून ३४ रिक्षा जप्त करण्यात आल्या. या कारवाईपोटी एक लाख ६८ हजार रूपयांचा दंडही वसूल केला आहे. दि. १४ फेब्रुवारी रोजी पनवेल शहरात एका रिक्षाचालकाने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने महिला प्रवाशावर तीक्ष्ण धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली होती. या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या पार्थभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पनवेल वाहतूक शाखा, पनवेल शहर पोलीस स्टेशन, खांदेधर पोलीस स्टेशन, आरटीओ पनवेलमार्फत विशेष तपासणी व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली. तसेच पोलीस मित्र, ज्येष्ठ नागरिक यांचे सहकार्य लाभले.
नियमभंग सहन केला जाणार नाही असा स्पष्ट संदेश देत ही धडक कारवाई करण्यात आली. यात पनवेल रेल्वे स्टेशन (पूर्व व पश्चिम) रिक्षा स्टॅन्ड तसेच एचडीएफसी सर्कल परिसरात एकूण पाच पथकांमार्फत मोठ्या प्रमाणावर तपासणी केली. या मोहिमेत अवैध प्रवासी वाहतूक करणारे, फिटनेस व विमा कालबाह्य असलेले, विना परवाना (लायसन्स), विना गणवेश तसेच नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षाचालक/मालक यांच्यावर कठोर कारवाई केली. पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ओटुंबर पाटील यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या कठोर कारवाईमुळे बेशिस्त रिक्षाचालकांना स्पष्ट इशारा देण्यात आला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक टृढ झाली आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
