उलवेत २० ते २२ फेब्रुवारीपर्यंत रंगणार कबड्डीचा थरार!
रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रायगड जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धा
पुरुपांचे ५९८ संघ आणि 3२ महिलांचे संघ होणार सहभागी
पनवेल (वार्ताहर) - माजी खा.रामशेठ ठाकूर यांचा ७५ वा वाढदिवस अर्थात अमृत महोत्सवी वर्ष अनेक समाजोपयोगी उपक्रमांद्रारे साजरे होत आहे. त्या अनुषंगाने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गटाची जिल्हा अजिंक्य पदाची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दि. २० ते रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उलवे नोडमधील से-१२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल जवळील रामशेठ ठाकूर मैदानात ही स्पर्धा संपन्न होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी सहकार्यवाह जे. जे. पाटील आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक व जिल्हा पंच मंडळाचे अध्यक्ष शरद कदम यांनी काल उलवे नोड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेत पुरुषांचे १९८ संघ आणि ३२ महिलांचे संघ सहभागी होणार असल्याने यानिमित्ताने दि.२० ते २२ फेब्रुवारीपर्यंत कबड्डीचा थरार रंगणार आहे.
पत्रकार परिषदेपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या सभागृहात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, मंडळाचे सचिव व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष हिराचंद पाटील, सूर्यकांत ठाकूर, खजिनदार जगदीश पाटील, समीर माने, जनार्दन पाटील, जिल्हा परिषद सदस्या निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, रत्नप्रभा घरत, अँड. राहुल घरत, भार्गव ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील प्रौढ महिला व पुरुष कबड्डी खेळाडूंकरिता ही स्पर्धा जिल्हा अजिंक्य पदासाठी निवड चाचणी स्वरूपात घेतली जाणार असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धांसाठी संघ निवड करण्याच्या दृष्टीने या स्पर्धला विशेष महत्त्व आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील १९८ पुरुष कबड्डी संघ आणि ३२ महिला संघ भाग घेणार आहेत. त्या अनुषंगाने २७७२ पुरुष आणि ४४८ महिला असे एकूण ३२२० खेळाडू सहभागी होणार आहेत. १९८ कबड्डी संघांमधून पुरुष संघातून संभाव्य २० खेळाडूंची तर ३२ महिला संघामधून संभाव्य २० महिला खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. आणि त्यातून निवड झालेला १४ पुरुष खेळाडूंचा संघ व १४ महिला खेळाडू संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दिनांक १३ फेब्रुवारीला रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या १०० पंचांचे एक दिवसीय मार्गदर्शक शिबीर पनवेलमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट आणि चुरशीच्या सामन्यांची क्रीडारसिकांना मेजवानी मिळणार आहे.
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
