नवी मुंबई वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
नवी मुंबई (प्रतिनिधी) - वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील वाहतूक पोलीसांकडे बॉडीवॉर्न कॅमेरे अनिवार्य करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नवी मुंबई वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे देण्यात आले आहेत. त्याचे उदघाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. बॉडीवॉर्न कॅमेरा वाहतूक पोलिसांच्या छातीवर दिसणार असल्याने पोलिसांशी हुज़त घालणार्यांना आता सावधान रहावे लागणार आहे.
नवी मुंबई पोलिसांना ४५ बॉडीवॉर्न कॅमेरे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वाहतूक पोलिसांच्या छातीवर कॅमेरे बसविले. यावेळी उपमुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी डॉ.श्री कृष्णनाथ पांचाळ, आ.किसन कथोरे, नवी मुंबईचे एपीआय अशोक वाघ तसेच वाहतूक पोलीस उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती देताना वाहतूक शाखेचे अधिकारी म्हणाले की, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह.आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या प्रयत्नामुळे वाहतूक पोलिसांना एक प्रकारे सुरक्षा कवच मिळाले आहे. या बॉडीवॉर्न कॅमेर्यामुळे वाहतूक पोलिसांनी चलन फाडल्यानंतर होणारे वाद विवाद टळणार आहेत. तसेच वाहतूक नियंत्रण करणे सोपे होणार असून वाहतूक पोलिसांचे लोकाशन, वाहतूकीची सद्यस्थिती काय आहे याचे चित्रिकरण केले जाणार आहे.तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सीसीटिव्ही मॉनिटरींग सेंटरमध्ये याचा कॅमेर्याचा रेकॉर्ड ठेवला जाणार आहे. वाहतूक विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी) ठाणे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यात एकूण ४३० बॉडी वॉर्न कॅमेर्यांचा प्रस्ताव असून त्यासाठी १.९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात ९८.८ लाख रुपये वितरित झाले असून, २३० कॅमेर्यांच्या खरेदीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे पोलीस वाहनांसाठी १०० डॅश कॅमेर्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत मंत्रालयाकडून तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया सुरु असून, या कॅमेर्यांच्या चाचण्या प्रगतीपथावर आहेत.
अनेकदा वाहतूक नियम मोडल्यावरुन पोलीस आणि नागरिक यांच्यात खटके उडतात. अशा वेळी बॉडी वॉर्न कॅमेरा हा ठोस पुरावा म्हणून काम करेल. तसेच, पोलीस वाहनांवरील डॅश कॅमेर्यांमुळे रस्ते अपघात किंवा गुन्हेगारी घटनांचे थेट चित्रीकरण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पारदर्शकता वाढणार असून गुन्हेगारीला चाप बसणार आहे. त्याचप्रमाणे पोलिसांवरील खोटया आरोपांना आळा बसेल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक नजर राहील. तसेच डिजिटल पुराव्यांमुळे न्यायालयीन प्रक्रियेत मदत होणार आहे. मिलिंद भारंबे (पोलीस आयुक्त, नवी मुंबई) तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलीस दलाला अधिक कार्यक्षम बनवणे हा आमचा उद्देश आहे. बॉडी वॉर्न कॅमेर्यांमुळे पोलिसांच्या कामकाजात पारदर्शकता येईल आणि डॅश कॅमेर्यांमुळे गस्ती दरम्यानच्या घटनांचे अचूक दस्तऐवजीकरण होईल. यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासार्हता अधिक वाढेल.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
