महापौर, उपमहापौरांसह आयुक्तांना विविध नागरी विषयांबाबत निवेदन

महापौर, उपमहापौरांसह आयुक्तांना विविध नागरी विषयांबाबत निवेदन

बेलापूर (वार्ताहर) - नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त कैलास शिंदे यांच्यासह महापालिकेचे संबंधित विभागीय अधिकारी यांची समाजसेवक निलेश कचरे यांनी काल सदिच्छा भेट घेऊन विविध नागरी विषयांवर निवदेन सादर केले. या सदिच्छा भेटीतील चर्चेदरम्यान विशेषतः नवी मुंबई शहरात गणेश उत्सव तसेच माघी गणपती कालावधीत विसर्जित झालेल्या श्री गणेश मूर्तींच्या शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जनाबाबत तसेच पर्यायी स्वरूपात त्यांचा पुनर्वापर करता येईल का? यासंदर्भात सखोल चर्चा केली. यावेळी धार्मिक भावना जपत पर्यावरणपूरक आणि शाक्त उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने सकारात्मक संवाद झाला. महापौर सुजाता पाटील व महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी यासंदर्भात उपरोक्त विषयांबाबत गांभीर्याने लक्ष देत अभ्यासपूर्ण नियोजन करून योग्य ती कार्यवाही लवकरच करण्यात येईल असे सकारात्मक आश्वासन संबंधितांना दिले असल्याचे निलेश कचरे यांनी सांगितले. नवी मुंबई अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास यानिमित्ताने कचरे यांनी व्यक्त केला.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

नवी मुंबईतील प्रलंबीत...

प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पास गती देण्याचे...