Breaking News

भाजपाचे लोकप्रतिनिधी जनहिताची काळजी घेणारे- ना.गणेश नाईक

भाजपाचे लोकप्रतिनिधी जनहिताची काळजी घेणारे- ना.गणेश नाईक

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील आणि नवनिर्वाचित उपमहापौर दशरथ भगत यांच्यासह सर्व नगरसेवकांनी काल वनमंत्री नामदार गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. भाजपाचे सर्व नगरसेवक जनतेच्या कल्याणाची काळजी घेणारे असून ते स्वच्छ व पारदर्शक कारभार करतील, असा विश्वास नामदार गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. पुढील वीस वर्षांच्या नवी मुंबईच्या विकासाचे नियोजन तयार असून त्याच्या अंमलबजावणीचा आराखडा लवकरच करण्यात येईल, असेही ते म्हणाले. स्वच्छ, हरित, विकसित, पर्यावरण पूरक सुविधायुक्त नवी मुंबईच्या या पुढील विकासाची दिशा निश्चित केली जाईल. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची घरे जमिनीच्या मालकीसह नियमित करणे, सिडकोची घरे आणि जमिनी फ्री होल्ड करणे, शासनाच्या माध्यमातून जमिनीच्या मालकीसह झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणे, मालमत्ता कर आणि पाणीपट्टी न वाढवणे या अनुषंगाने काम करण्यात येईल. नवी मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपाचे घवघवीत यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघटन कुशल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आणि नवी मुंबईत या विजयासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आहे असे नमूद करून निवडणुकीमध्ये सकारात्मक भूमिका घेणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांचे देखील नामदार गणेश नाईक यांनी यावेळी कौतुक केले.


Most Popular News of this Week

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...