Breaking News

रोलीत अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

रोलीत अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (२) डॉ.राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ.कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात काल निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या या कारवाईत, जी विभाग ऐरोली कार्यालयाअंतर्गत एसएस-२/बी-२२९, से-०२, ऐरोली, येथे बबन बाबू पवार, गुफरान खान (ठेकेदार), आर्किटेक्ट ओमकार निर्गुडे यांनी तसेच एसएस-२/बी-२३०, से-२, ऐरोली येथे प्रेमानंद प्रजापती, गुफरान खान (ठेकेदार), ओमकार निर्गुडे (आर्किटेक्ट) यांनी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. त्यामुळे त्यांच्या अनधिकृत बांधकामांस जी विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. या नोटीसीनूसार संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम हे स्वतःहून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम करण्याचे सत्र सुरूच ठेवले होते. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईसाठी सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी नैनेश एस. बदले, यांचे नियंत्रणाखाली तोडक मोहिमेचे आयोजन करुन सदर अनधिकृत बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले. तसेच अनधिकृत बांधकाम हटविण्याचे दंडात्मक शुल्क प्रती ५ हजार रुपये प्रमाणे एकूण दहा हजार इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. सदर धडक मोहिमेसाठी जी-विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, १० मजूर, २ ब्रेकर, १ गॅसकटर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता.


Most Popular News of this Week