नवी मुंबईतील फेरीवाले महापालिकेच्या रडारवर?
नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर नवी मुंबईत महापालिका अतिक्रमण विभागाकडून शहरातील विविध ठिकाणच्या अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्धची मोहीम पुन्हा तीव्र केळी असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा फेरीवाल्यांसह मार्जिनल स्पेसचा गैरवापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेने कारवाईची मोहिम उघडली असल्याचे दिसते. विशेषतः ऐरोली पटनी रोडसह कोपरखैरणे व इतर ठिकाणी फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करून ते डॅपिगवर जमा केले जात आहे. राज्यातील महापालिका निवडणूकीनिमित्त प्रशासकीय यंत्रणा निवडणूकीच्या कामकाजात व्यस्त असल्यामुळे फेरीवाल्यासह अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची मोहिम थंडावली होती. मात्र आता निवडणूकींचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेने थांबलेली फेरीवाला हटाव मोहीम कडक केली असल्याचे दिसून येते. कारवाईच्या या मोहिमेअंतर्गत काल दि.२ फेब्रुवारी रोजी ऐरोली विभाग कार्यक्षेत्रातील ऐरोली पटणी रोड येथील अनधिकृत चायनीज खाद्यविक्रेत आणि आई स्क्रीम गाडी जप्त करून डम्पिंग येथे पाठवण्यात आले. यासह ऐरोली विभाग कार्यक्षेत्रातील एका अनधिकृत बांधकामावर काल कारवाई करण्यात आली. यात ऐरोली बोर्ड से- दोन बी २२९ येथे अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई महापालिकेचे अभियंता रितेश गुरव, वरिष्ठ लिपिक गणेश जगणे यांच्यासह लेबर यांच्या मार्फत हाती घेण्यात आली होती.
दरम्यान, एकीकडे भरमसाठ वाहनांची वाढलेली संख्या आणि त्यामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या सध्या शहराची फारच डोकेदुखी ठरत आहे. याच धर्तीवर या वाहतूक समस्येचे कारण ठरणारे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचे सत्र प्रशासनाने हाती घेतल्याचे दिसून येते. मात्र असे असले तरी काही ठराविक फेरीवाल्यांवरच कारवाई होत असल्याचा आरोपही काही फेरीवाल्यांकडून होतांना दिसत आहे. ठाणे बेलापूर मार्गावर रबाळेगाव भुयारी मार्गालगत रात्रीच्या सुमारास वाहन उभे करून फळविक्री करण्याचे प्रकार काही परप्रांतीय फेरीवाल्यांकडून होतांना दिसत आहे. या प्रकारामुळे या मार्गावर वाहतूर्कीस अडथळा येत असल्याने इतर फेरीवाल्यांप्रमाणे वाहतूक समस्येस कारणीभूत ठरणाऱ्या या फेरीवाल्यांवर महापालिका कारवाई करेळ का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील सत्ताधारी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...
महापालिकेला फसविणाऱ्या...
अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
