Breaking News

जिल्हा परिषद, पंचायत समिती रणधुमाळी...

जिल्हा परिषद, पंचायत समिती रणधुमाळी...

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ माथाडी भवनमध्ये पाटणवासियांचा मेळावा

विकासाभिमुख आणि सक्षम नेतृत्वाला साथ देण्याचे ना.गणेश नाईक यांचे आवाहन

वाशी (प्रतिनिधी) - महापालिका निवडणूकीच्या रणधुमाळी संपुष्टात आल्यानंतर आता येत्या ७ फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीनिमित्त राजकीय हालचालींना पुन्हा वेग आल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील माथाडी भवन येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्थभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी ना.गणेश नाईक यांनी नवी मुंबईत, मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या पाटण तालुक्‍यातील नागरिकांशी थेट संवाद साधत, येणाऱ्या निवडणुकीत विकासाभिमुख आणि सक्षम नेतृत्वाला साथ देण्याचे आवाहन केले.

पाटणच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केला आणि सभेत विजयाचा हुंकार भरला. याला प्रतिसाद देत उपस्थित पाटणकर बांधवांनीही उत्स्फूर्तपणे विजयाचा हुकार भरला. विकासाची ही लाट आता पाटणमध्ये परिवर्तन घडवणार, असा विश्वास सभागृहात यावेळी स्पष्टपणे व्यक्त होतांना दिसत होता. या सभेस सत्यजितसिहे विक्रमसिहं पाटणकर, हिंदुराव पाटील, रमेश पाटील, अविनाश रामिष्ठे, नगरसेवक डी.आर.पाटील, नगरसेवक गणेश सकपाळ, नगरसेवक शिवाजीराव खोपडे, नगरसेविका अँड.भारती पाटील, नगरसेविका नेत्रा शिर्के आदींसह मुंबई येथील पाटण तालुका रहिवासी मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...