Breaking News

मुंबई मनपातील भाजपच्या नगरसेवकांनी घेतली आ. मंदा म्हात्रेंची सदिच्छा भेट...

मुंबई मनपातील भाजपच्या नगरसेवकांनी घेतली आ. मंदा म्हात्रेंची सदिच्छा भेट...

मुंबईच्या सर्वागीण विकासासाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन

बेलापूर (वार्ताहर) - बेलापूर येथील कोकण भवन येथे मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या भाजपच्या विजयी नगरसेविकांची गटनोंदणी प्रक्रिया पार पडली. या पार पडलेल्या गटनोंदणी प्रक्रियेनिमित्त बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आमदार मंदा म्हात्रे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आममंदा म्हात्रे यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान करण्यासह मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले. या नगरसेवकांच्या सन्मानार्थ आ.मंदा म्हात्रे यांच्याकडून स्नेहमोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर भेटीदरम्यान आ.मंदा म्हात्रे यांनी सर्व विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करून पुढील काळात मुंबईच्या सर्वागीण विकासासाठी संघटितपणे काम करण्याचे त्यांना आवाहन केले. गटनोंदणी प्रक्रियेसंदर्भात सकारात्मक चर्चा होऊन पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.


Most Popular News of this Week