शर्मिला पिंपळोलकर यांची ठाणे महापौरपदी तर कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड
शर्मिला पिंपळोलकर यांची ठाणे महापौरपदी तर कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड
ठाणे (03 ) : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आज पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत ठाणे शहराच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची, तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केली.
आज (04 फेब्रुवारी) सकाळी 11.30 वाजता ठाणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हाधिकारी, ठाणे तसेच महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते.
महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर व उपमहापौर कृष्णा पाटील यांचे तुळशीचे रोप देऊन अभिनंदन व स्वागत केले.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
