वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घणसोलीतील दोन विकासकांवर कामे बंद कारवाई
वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घणसोलीतील दोन विकासकांवर कामे बंद कारवाई
वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबताना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रातील बांधकाम साईट्सवर मानक कार्यप्रणालीनुसार कार्यवाही होत असल्याबद्दल काटेकोर पाहणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तुर्भे विभागातील 7 बांधकाम साईट्सवरील काम बंद करण्यात आले आहे.
अशाच प्रकारे घणसोली विभाग कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी वायू व ध्वनी प्रदूषणाबाबतच्या मानक कार्यप्रणालीतील नियमांची अंमलबजावणी न केल्यामुळे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त -2 डॉ राहुल गेठे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, सहायक संचालक नगररचना श्री.सोमनाथ केकाण, परिमंडळ -२ उपायुक्त श्री. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सेक्टर 3 घणसोली येथील भूखंड क्र. 24 व 25 या ठिकाणची गामी अँड कृष्णा इंटरप्राईजेस ही मालमत्ता सील केलेली आहे तसेच भूखंड क्र. 26, सेक्टर 3 येथील लाल केबी इन्फ्रा प्रा.लिमी. या विकासकाचे बांधकाम बंद करण्यात आलेले आहे.
घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.वसंत मुंडावरे यांच्या नियंत्रणाखाली, कार्यकारी अभियंता श्री.यशवंत कापसे, उप अभियंता श्री.रमेश गुरव, उप अभियंता श्री.किरण पाटील तसेच कनिष्ठ अभियंता, स्वच्छता अधिकारी, उद्यान सहाय्यक यांनी ही कारवाई केली.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
ऐरोली डी मार्ट परिसरात...
शिवसेना नगरसेवक ममित चौगुले यांचे बेशिस्त वाहनधारकांना शिस्तीचे...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
एमआयडीसीची उरणमध्ये पाणी...
उरण (वार्ताहर) - उरण तालुक्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिकेकडे पाणी...
नवी मुंबई महापालिकेची २०२६-२७...
व्हाट्सअँप चॅटबॉट व संकेतस्थळाद्वारे नागरिकांना बिल डाउनलोड करण्याची...
न्हावा शेवा पाणीपुरवठा टप्पा...
आ.प्रशांत ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश पनवेल (प्रतिनिधी) – पनवेल...
