प्लास्टिक प्रतिबंधात्मक सलग मोहीमेत 10 हजार दंड वसूली व 11.5 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
प्लास्टिक प्रतिबंधात्मक सलग मोहीमेत 10 हजार दंड वसूली व 11.5 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
नवी मुंबई - प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये सातत्य राखण्यात येत असून दि. 22 जानेवारी रोजी 5 व्यावसायिकांकडून रू. 25 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 7 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांच्या साठा जप्त करण्याप्रमाणेच सलग दुस-या दिवशीही 23 जानेवारी रोजी राबविण्यात आलेल्या मोहीमेत 2 व्यावसायिकांकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्याने रू. 10 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 11.5 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्तीची धडक कारवाई करण्यात आलेली आहे.
यामध्ये वाशी विभागात 5 हजार दंडवसूली व 1 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांची जप्ती तसेच तुर्भे विभागात 5 हजार दंडवसूली आणि 3.5 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करिता विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा राबविण्यात येत आहेत. याविषयी केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्राप्त निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने विशेष मोहीमा राबविण्यात येत आहेत.
प्लास्टिकचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा व एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर पूर्णपणे थांबवावा आणि कापडी पिशव्यांचा पर्याय स्विकारावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
Most Popular News of this Week
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
११ जणांच्या मृत्यूनंतर...
कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
