Breaking News

निवडणुकीनंतर घणसोलीत लावलेल्या बॅनरची शहरभर चर्चा...

निवडणुकीनंतर घणसोलीत लावलेल्या बॅनरची शहरभर चर्चा...

ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्याला जनता कधीच माफ करणार नाही!

नवी मुंबई (प्रतिनिधी) - मुंबई, ठाणे, पुणेसह नवी मुंबई अशा राज्यातील तब्बळ २९ महापालिकांच्या निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच आटोपला आहे. नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जरी संपली असली तरी निवडणुकीनंतर शहरात राजकीय पक्षांकडून डिवचणारे बॅनर लावण्यास सुरुवात झाली असल्याने निवडणूकीनिमित्त तापळेले राजकीय वातावरण थंडावण्याऐवजी आता पुन्हा एकदा यानिमित्ताने राजकीय वातावरण तापण्यास पोषक वातावरण मिळू लागले आहे. नवी मुंबईतील घणसोली परिसरात फुटपाथच्या बाजुला' सेक्टर-९ येथे ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्याला जनता कधीच माफ करणार नाही” या मथळ्याखाली एक सुज्ञ घणसोलीकर मतदार... अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला असून, सध्या नवी मुंबई शहरभर या बॅनरची जोरदार चर्चा आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूकीनिमित्त आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्यांमुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. निवडणूक निकालानंतर भाजपने उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना डिवचणारे बॅनर लावले होते. त्यानंतर आता नवी मुंबईतील एक संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घणसोलीत, ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्याला जनता माफ करणार नाही, अशा आशयाच्या लावलेल्या या बॅनरबाजीमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्यास खतपाणी मिळतांना दिसत आहे. घणसोली सेक्टर ९ मधील संत निरंकारी चौकामध्ये सदरचा बॅनर लावण्यात आलेला आहे. यात ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्याला जनता कधीच माफ करणार नाही. एक सुज्ञ घणसोलीकर मतदार, अशा आशयाचा मजकुर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. नुकत्याच महापालिका निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता अशा स्वरूपाचा बॅनर लावण्यात आल्यामुळे सध्या या बॅनरची घणसोलीसह नवी मुंबईमध्ये जोरदार चर्चा आहे. नेमका कोणी हा बॅनर लावला व या सगळ्यामागील करविता धनी कोण आहे, अशी विविध स्वरूपाची चर्चाही यानिमित्ताने होतांना दिसत आहे. ऐन फुटपाथवर हा बॅनर लावण्यात आला व आहे व सोशलमिडीयावरही या बॅनरचे फोटो व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून घणसोलीतील हा बॅनर सध्या शहरभर चर्चेचा विषय बनला आहे.


Most Popular News of this Week