Breaking News

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून भाजपाच्या विजयी नगरसेवकांचा सत्कार!

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून भाजपाच्या विजयी नगरसेवकांचा सत्कार!

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ६५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल नवी मुंबईत नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. विजयाचा जल्लोष साजरा केला. वनमंत्री ना.गणेश नाईक यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजपने नवी मुंबईत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निवडणुकीत भाजपचे तब्बल ६५ उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि नवनियुक्त लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. याप्रसंगी वनमंत्री ना.गणेश नाईक, माजी खासदार तथा निवडणूक प्रमुख डॉ.संजीव नाईक, माजी आ.संदीप नाईक, माजी महापौर तथा नवनिर्वाचित नगरसेवक सागर नाईक आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ना.गणेश नाईक यांच्या नेतृत्वाचा गौरव केला. ते म्हणाले की, मागील ३० वर्षांहून अधिक काळ नवी मुंबईची धुरा सांभाळणाऱ्या ना.गणेश नाईक यांच्या दूरदृष्टीवर आणि सुरक्षित नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली आहे. यावेळी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नगरसेवकांना एक नवा 'मंत्र"ही दिला. स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर नवी मुंबईत वॉर्ड व्हॉइस” सारख्या नावीन्यपूर्ण स्पर्धा आणि उपक्रम राबवण्याचे आवाहन त्यांनी केले. अशा उपक्रमांतून नवी मुंबईची एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि इतर शहरांनाही नवी मुंबईचा आदर्श घ्यावा लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...