Breaking News

ठाणे महापालिकेसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर

ठाणे महापालिकेसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर

ठाणेकरांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचा महायुतीचा संकल्प

ठाणे (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिकेचा अपवाद वगळता राज्यातील २९ महापालिकांपैकी बहूतांश ठिकाणी शिवसेना (शिंदे) व भारतीय जनता पक्ष हे दोन पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवत आहेत. मुंबई, नवी मुंबई पाठोपाठ सर्वाधिक महत्वाची मानली जाणारी ठाणे महापालिकेची निवडणूक शिवसेना व भाजप महायुती एकत्रित लढत असून, ठाणे महापालिका क्षेत्रासाठी शिवसेनेच्या वतीने वचननामा जाहीर करण्यात आला. शिवसेनेकडून जाहीर केलेल्या या वचननाम्यातून ठाणे शहर अधिक सुंदर, स्वच्छ आणि आकर्षक बनवण्याचा संकल्प मांडण्यात आला असून, नागरिकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि सुखद जीवन जगता यावं यासाठी ठोस आणि लोकाभिमुख आश्वासनं देण्यात आली. शिवसेना-भाजप युतीच्या या वचननाम्यात मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन यांना प्राधान्य देण्यात आलं आहे. जनतेच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याची भूमिका या वचननाम्यातून स्पष्टपणे मांडण्यात आली आहे, ठाणेकरांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचा महायुतीचा संकल्प आहे. महायुती केवळ आश्वासन देत नाही, तर दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करते हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. त्यामुळे या वचननाम्यात नमूद केलेली प्रत्येक गोष्ट देखील पूर्ण केली जाईल, असा शब्द देखील यावेळी दिला.


Most Popular News of this Week

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...