तुझ्या बापाला माझ्यासोबत नॉनस्टॉप चालण्यास सांग!

तुझ्या बापाला माझ्यासोबत नॉनस्टॉप चालण्यास सांग!

ना.गणेश नाईकांचे खा.डॉ.श्रीकांत शिंदेंना आवाहन

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळी निमित्ताने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडलेल्या असतानाच भाजपा नेते गणेश नाईक यांनी खा.श्रीकांत शिंदे यांचेकडून करण्यात आलेल्या “नाईकांचे वय झाले" या टिकेचा तिखट शब्दात समाचार घेतला. सत्तेच्या या सारीपाटासाठी होणाऱ्या या राजकारणापायी एकमेकांवर वैयक्तिक स्वरूपाची टिकाटिप्पणी तसेच आवाहन देण्याची भाषा करण्यासह आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडतांना दिसत आहे. राज्याचे वनमंत्री तथा भाजप नेते गणेश नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा टांगा पलटी करण्यासह घोडे बेपत्ता करण्याचे यापूर्वी आवाहन दिलेले असतांनाच, त्यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव व कल्याणचे खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता, त्यांनाही एकप्रकारे आवाहन दिले आहे.

तुझ्या बाप्पाला माझ्यासोबत नॉनस्टॉप चालण्यास सांग... जर मी हरलो तर राजकारण सोडेल असे आवाहन दिले आहे. नामदार गणेश नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिकेबाबत बोलतांना खा. श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे आता वय झाले असल्याची टिका केली आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेप्रसंगी बोलतांना नामदार गणेश नाईक यांनी खा.श्रीकांत शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला. तुझ्या बापाला माझ्यासोबत नॉनस्टॉप चालण्यास सांग... जर मी हरलो तर राजकारण सोडले असे वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्यावरून सध्या पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, उपमुख्यमंत्री यांना माझे आव्हान आहे की, तुम्ही मला हलक्‍्यात घेतले. तुझा पोरगा मला म्हणतो की, माझे वय झाले आहे. मी दिघ्यात १२ किलोमिटर नॉनस्टॉप चाललो. कोपरखैरण्यात साडेदहा किलोमीटर चाललो. त्यामुळे तुझ्या बापाला माझ्यासोबत नॉनस्टॉप चालण्यास सांग... जर मी हरलो तर राजकारण सोडेल, नाहीतर तुझ्या बापाला राजकारण सोडण्यास सांग असे टिकास्त्र सोडत ना.गणेश नाईक यांनी एकप्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन दिले.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

नवी मुंबईतील प्रलंबीत...

प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पास गती देण्याचे...