Breaking News

नवी मुंबईत आठ ठिकाणी स्वतंत्र मतमोजणी व्यवस्था

नवी मुंबईत आठ ठिकाणी स्वतंत्र मतमोजणी व्यवस्था

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ करीता दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वा. या कालावधीत मतदान होत असून दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी होत आहे. दि. १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळ पासून आठही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून मतदान केंद्रावर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र व मतदान केंद्रावरील साहित्य वितरण केले जाणार असून दि. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतदान साहित्य स्विकृती होणार आहे. या सर्व कार्यालयामधील स्ट्रॉंग रुममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे सिलींग करुन ठेवण्यात आलेली आहेत. दि. १६ जानेवारी रोजी या आठ निवडणूक निर्णय कार्यालयाच्या ठिकाणी सकाळी १० पासून मतमोजणीला सुरुवात होणार असून त्यासाठी स्वतंत्र मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे व त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झालेले आहे. प्रभाग क्रमांक १, २, ३ साठी माता व बाल रुग्णालय इमारत, दिघा येथे मतमोजणी होणार असून धैर्यशील जाधव हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रभाग क्रमांक ४, ५, ७ साठी सरस्वती विद्यालय, से.५, ऐरोली येथे मतमोजणी होणार असून याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिपक आकडे असणार आहेत. प्रभाग क्रमांक ६, ८, ९ साठी समाजमंदिर हॉल, भूखंड क्र.१०, सेक्टर-0७, घणसोली येथे मतमोजणी होणार असून याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कल्पना गोडे असणार आहेत. प्रभाग १०, ११, १२, १३ साठी अण्णासाहेब पाटील सभागृह, १ ला मजला, से.५, कोपरखैरणे येथे मतमोजणी होणार असून सुभाष काकडे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असणार आहेत.

प्रभाग १४, १५, १९, २० साठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजमंदिर, प्लॉट नं.१८७, से.१०, सानपाडा येथे मतमोजणी होणार आहे. याठिकाणी सांदिपान सुर्यकांत सानप हे निवडणूक अधिकारी म्हणून असणार आहेत.

प्रभाग १६, १७, १८ साठी जलतरण तलाव संकुल, भूखंड क्र.१९६,१९६ ए, से.१२, वाशी येथे मतमोजणी होणार असून प्रितीलता कौरथी ह्या निवडणूक अधिकारी म्हणून असणार आहेत.

प्रभाग २१, २२, २३, २४ साठी पहिला मजला, आगरी कोळी भवन, प्लॉट नं.१२, से.२४, नेरुळ येथे मतमोजणी होणार आहे. याठिकाणी मोहन नळदकर हे निवडणूक अधिकारी असणार आहेत.

प्रभाग २५, २६, २७, २८ साठी दुसरा मजला, आगरी कोळी भवन, प्लॉट नं.१२, से.२४, नेरुळ येथे मतमोजणी होणार असून याठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून प्रीती पाटील असणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मतदानापूर्वी ४८ तास आधी म्हणजेच दि.१३ जानेवारी २०२६ रोजी, सायंकाळी ५.३० वा. निवडणूक प्रचार कालावधी संपुष्टात आला असून या पूढील काळात मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडीयाव्दारे कोणत्याही व्यक्तीस, उमेदवारास, राजकीय पक्षास प्रचार करता येणार नाही याची नोंद घ्यावयाची असून नवी मुंबई महानगरपालिकेची आचार संहिता पथके याबाबत दक्ष आहेत. आचारसंहितेचा भंग करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात येत आहे. दि.१५ जानेवारी २०२६ रोजी सर्व नवी मुंबईकर नागरिकांनी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि शहर विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...