Breaking News

मुंबईत फ्रीजचा भीषण स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मुंबईत फ्रीजचा भीषण स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मुंबई - मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील एका इमारतीत पहाटे भीषण आग लागली. या दुर्दैवी अभ्निकांडात ३ जणांचा गुदमरून मृत्यू झाला, ज्यात २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अग्निशमन दलाने आग विझविली असली तरी, आगीचे नेमके कारण अजून अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे . गाढ झोपेत असलेल्या मुंबईकरासांठी शनिवार (१० जानेवारी)ची पहाट भयानक ठरली. गोरेगाव पश्चिमेकडील एका इमारतीत झालेल्या भीषण अग्निकांडामुळे प्रचंड खळबळ माजली. या आगीत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनीही तातडीने धाव घेत अथक प्रयत्न करून ती आग आटोक्यात आणली. मात्र, घरात झोपलेल्या तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृत नागरिकांमध्ये २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यामुळे भीतीचे वातावरण असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. बीएमसीच्या अधिकृत निवेदनाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील भगतसिंगनगर येथील इमारतीमधील तळमजल्यावरील घरात आग लागली. फ्रीजचा मोठा स्फोट होऊन ही आग लागली. प्रथम ती आग प्रामुख्याने तळमजल्यावरील विद्युत वायरिंग आणि घरगुती वस्तूपर्यंत मर्यादित होती, मात्र ती पसरली आणि पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील तीन लोकांच्या कपड्यांना आग लागली. त्या घराचा नंबर अजून समोर आलेला नाही.

पहाटेच्या सुमारास ही आग लागली तेव्हा सगळेच गाढ झोपेत होते. मात्र आग लागल्याचे समजताच इमारतीतील नागरिकांनी फायर ब्रिगेडला फोन केला. तसेच ते जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्थानिकांनी बादल्यांमधून पाणी ओतत आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विजेचे कनेक्शन बंद करून फायर ब्रिगेडच्या जवानांनीही आगीवर नियंत्रण मिळवत ती पूर्णपणे विझविली. या आगीच्या ज्वाळांमुळे जखमी झालेल्या तिघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आणि उपचारांसाठी ट्रामा केअर रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर आगीमुळे होरपळलेल्या तिघांचाही रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. हर्षदा पावसकर (१८), कुशल पावसकर (१२) आणि संजोग पावसकर (४८) अशी मृतांची नावं आहेत. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग पूर्णपणे विझविली आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली ते कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


Most Popular News of this Week

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...