Breaking News

घणसोलीत १३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली “मतदार जागरूक दूत" महाप्रतिज्ञा

घणसोलीत १३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली “मतदार जागरूक दूत" महाप्रतिज्ञा

बेलापूर (वार्ताहर) - निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव हे लक्षात घेत १५ जानेवारी रोजी होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने घणसोली परिसरात निवडणूकीच्या “स्वीप"उपक्रमांतर्गत ६, ८ आणि ९ प्रभागांच्या क्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या तब्बल १३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांच्या परिसरात एकत्र ये एकाच वेळी सामूहिकरित्या मतदार जागरूक दूत” म्हणून प्रतिज्ञा घेतली. आम्ही आज जरी मतदार नसलो, तरी मतदार जागरूक टूत म्हणून समाजाला नवी दिशा देऊ" - असा ठाम निश्चय या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिज्ञेतून केला. या मतदानाच्या महासंकल्प मोहीमेत घणसोली आणि परिसरातील नवी मुंबई महापालिका शाळा क्र. ५५ व १०४ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर), शाळा क्र. ७८ गौतम नगर, शाळा क्र. ४० व ११३ महापे, शाळा क्र. ३९ हनुमान नगर, शाळा क्र. ४१ व १२३ अडवली भूतावली, शाळा क्र. ३४ व ११५ श्रमिक नगर, शाळा क्र. ४४ तळवली, शाळा क्र. ४२ घणसोली, शाळा क्र. १०५ घणसोली आणि शाळा क्र. ७६ घणसोली या नमुंमपा शाळांतील विद्यार्थी, शिक्षकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. घणसोलीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना गोडे, विभाग अधिकारी वसंत मुंडावरे, कार्यकारी अभियंता यशवंत कापसे आणि घणसोली विभागाचे स्वीप कार्यक्रम प्रमुख उपअभियंता संतोष मोरस्कर यांच्या सुयोग्य नियोजनामुळे या मोहिमेला मोठे स्वरूप प्राप्त झाले. स्वीप समन्वयक अधिकारी कमलेश इंगळे यांनी या सर्व शाळांच्या समन्वयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.


Most Popular News of this Week