नवी मुंबईत आचारसंहितेच्या काळात १६.१६ लाखांची रोख रक्कम जप्त
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेकडून ९ ठिकाणी एकूण ३ सत्रांत २७ स्थिर संनिरीक्षण पथके (SST) कार्यरत आहेत. या कारवाईदरम्यान आज दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १२.३५ वाजता वाशी येथील अरेंजा कॉर्नर परिसरात वाहन क्रमांक MH 43 BG 0002 (पांढरी मर्सिडीज कार) याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अंदाजे १६ लाख १६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सागर मोरे, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी अमोल पालवे, तुषार दौंडकर, अधीक्षक/वसुली अधिकारी संजय गायकवाड, पोलीस नाईक सचिन सूर्यवंशी तसेच SST पथक प्रमुख अजय शेलार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या प्रकरणी आयकर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Most Popular News of this Week
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
११ जणांच्या मृत्यूनंतर...
कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
