शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ ना.एकनाथ शिंदेंचा जोरदार रोड शो...
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ ना.एकनाथ शिंदेंचा जोरदार रोड शो...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त सध्या प्रचारास वेग आला आहे. महापालिकेची ही निवडणूक पहिल्यांदाच बहुसदस्यीय पध्दतीने होत असल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वपक्षीयांकडून विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. नवी मुंबई मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐरोली विधानसभा क्षेत्रात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाणे बेलापूर महामार्गावर शिवसेनेतर्फे जोरदार रोड शो चे आयोजन करून एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.राज्यात शिवसेना व भाजप हे मित्र पक्ष सत्तेत एकत्रीत वाटेकरी असले तरी मित्र पक्ष असलेल्या भाजपबरोबर नवी मुंबईत युतीचा तिढा शेवटपर्यंत न सुटल्याने ठाणे व राज्यातील इतर काही महापालिकांचा अपवाद वगळता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नवी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणे पसंत केले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवून शिंदेसेनेने प्रचारास जोरदारपणे सुरुवातही केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल ऐरोली विधानसभा मतदार संघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.दिघागाव रेल्वे स्थानकानजीकच्या विटावा येथे फटाके फोडून आणि चार ते पाच जेसिबीने फुलांची उधळण करून दिघा परिसरातील विटावा येथील प्रवेशद्वारापासून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. यावेळी या रॅलीत शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश कदम, शिवसेना उपनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमख द्रारकानाथ भोईर आदींसह शिवसेनेचे उमेदवार तसेच शेकडो दुचाकीस्वार, महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झोपडपट्टयांचा एसआरणएतून पुनर्विकास करू!
या रॅलीप्रसंगी विराजमान झालेल्या वाहनामधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांसह नागरिकांचे अभिवादन स्विकारतांना दिसत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नगरविकास खाते माझ्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. एमआयडीसी आणि इतर भूखंडावर वसलेल्या झोपडपट्टयांचा एस.आर.एच्या माध्यमातून पुनर्विकास करू, असे अभिवचन त्यांनी दिले.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
