बेलापूर प्रभाग क्रमांक २७ आणि प्रभाग क्रमांक २८ च्या अधिकृत उमेदवारांसमवेत आ. मंदा म्हात्रे यांची बैठक
बेलापूर प्रभाग क्रमांक २७ आणि प्रभाग क्रमांक २८ च्या अधिकृत उमेदवारांसमवेत आ. मंदा म्हात्रे यांची बैठक
बेलापूर - नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्काचा वेग वाढवण्यासाठी, काल बेलापूर प्रभाग क्रमांक २७ व २८ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्त्यांसोबत आ.मंदा म्हात्रे यांची विशेष बैठक पार पडली. याबैठकीत प्रचार सभा, प्रचार रॅलीचे नियोजन, प्रभागातील स्थानिक प्रश्न आणि आमदार मंदा म्हात्रे यांनी १५१ बेलापुर मतदार संघात केलेली विकासकामे पोहोचवण्याची रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उमेदवारांचा व कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहून या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित असल्याचा टृढ विश्वास आ.मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला. कमळाचा" संदेश आणि विकासाची नीती प्रत्येक घरा घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व उमेदवारांनी सज्ञ व्हावे, असे मार्गदर्शन आ.मंदा म्हात्रे यावेळी केले. याप्रसंगी माजी नगरसेवक व महामंत्री नवी मुंबई जिल्हा निलेश म्हात्रे, बेलापूर मंडळ अध्यक्ष अजय सिंग, जेष्ठ भाजपा कार्यकर्ता गोपाळराव गायकवाड, दिपक जोशी, समीर मनोरे, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र दिवाळे अध्यक्ष चंद्रकांत कोळी, डोलकर मच्छिमार अध्यक्ष तुकाराम कोळी, दिवाळे गाव मानाची पालखी अध्यक्ष करेश मुंबईकर, वेताळेश्वर मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरेश कोळी, एकवीरा रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष ज्ञानेधर कोळी, आरती राऊळ, अलका कामत, सुरेखा बामणकर, कांतीदेवी चौधरी, दर्शन भारद्राज, नानजी भाई, जयदेव ठाकूर, मानेश बिजलानी, सचिन निळे, सुधीर पाटील, कल्पेश कुंभार, कैलास कोळी व भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
ऐरोली डी मार्ट परिसरात...
शिवसेना नगरसेवक ममित चौगुले यांचे बेशिस्त वाहनधारकांना शिस्तीचे...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
एमआयडीसीची उरणमध्ये पाणी...
उरण (वार्ताहर) - उरण तालुक्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिकेकडे पाणी...
नवी मुंबई महापालिकेची २०२६-२७...
व्हाट्सअँप चॅटबॉट व संकेतस्थळाद्वारे नागरिकांना बिल डाउनलोड करण्याची...
न्हावा शेवा पाणीपुरवठा टप्पा...
आ.प्रशांत ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश पनवेल (प्रतिनिधी) – पनवेल...
