सौरभ शिंदे यांच्या प्रचार रॅलीने घणसोली फुल्ल!

सौरभ शिंदे यांच्या प्रचार रॅलीने घणसोली फुल्ल!

घणसोली (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे रिंगणात असणारे युवा नेते सौरभ शिंदे यांच्या प्रचार रॅलीच्या गर्दीने रविवारी सर्वांनाच अवाक्‌ केले. यावेळी मतदारांशी संवाद साधताना सौरभ शिंदे यांनी घणसोलीकरांसाठी एक सुसज़़ अधिक खाटांचे रुग्णालय, सीबीएससी अभ्यासक्रम शाळा अशा मुलभूत तसेच आवश्यक गरजांसाठी प्रयत्नरत राहण्याची ग्वाही दिली. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. अशातच घणसोलीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या घणसोळीतील सौरभ शिंदे यांच्या प्रभाग क्र. ९ या पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी शेकडो नागरिकांनी रॅलीत गर्दी केली होती. यावेळी सौरभ शिंदे म्हणाले की, कोणालाही कमी लेखत नाही. आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे, योजना तसेच आमचे प्रभागासाठी असलेले व्हिजन यावर भर देऊन प्रचार करत आहोत. घणसोली विभागात रुग्णालयाची गरज आहे. प्रमोद पाटील म्हसकर तसेच सुरेश सकपाळ यांनी आरोग्य सुविधेसाठी भुखंड सिडकोकडून हस्तांतरीत करण्यात यश मिळविले आहे. त्यावर रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

नवी मुंबईतील प्रलंबीत...

प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पास गती देण्याचे...