नवी मुंबईत विद्यार्थ्यांनी पत्रलेखनातून कुटूंबियांना केला मतदानाचा आग्रह
नवी मुंबईत विद्यार्थ्यांनी पत्रलेखनातून कुटूंबियांना केला मतदानाचा आग्रह
बेलापूर (वार्ताहर) - नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत यावेळी पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक होत असून नागरिकांनी या पध्दतीत कसे मतदान करावे याकरिता विविध माध्यमांचा वापर करुन जनजागृती केली जात आहे. या अनुषंगाने मतदार जनजागृतीच्या स्वीप उपक्रमांतर्गत पालकांना व नातेवाईकांना मतदानाचे आवाहन करणारा पत्रलेखन हा अभिनव उपक्रम नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक ३६ व १२२ कोपरखैरणे गाव या ठिकाणी राबविण्यात आला. या अंतर्गत २०२६ इतक्या मोठया संख्येने विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर पत्रलेखन करुन आपले आई वडील, कुटूंबिय, नातेवाईक यांना १५ जानेवारी रोजी होणाऱ्या नवी मुंबई महापालिका निवडणूकीत आमच्या भविष्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणूक विषयक स्वीप उपक्रमांचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ. अजय गडदे आणि शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षणांधिकारी अशोक कडूस व शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा बारघरे यांच्या नियंत्रणाखाली, केंद्र समन्वयक जयप्रकाश सिंह व मुख्याध्यापक संख्ये आणि डॉली चराटकर यांच्या माध्यमातून मतदान करणे विषयी आवाहन करणारा पत्रलेखनाचा अभिनव उपक्रम अतिशय उत्साहात राबविण्यात आला. शाळेचे कलाप्रेमी शिक्षक प्रशांत गाडेकर यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयकाची महत्वाची भूमिका बजावली. या कामी त्यांना संतोष मळेकर आणि शाळेतील शिक्षक व समुहसंघटकांचे सहकार्य लाभले.
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
