शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप सुस्साट!
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप सुस्साट!
भाजपाचे १४ तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध
ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेगट यांच्या महायुतीनं आतापर्यंत १२२ जागांपैकी २० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. महायुतीनं मतदानाला १३ दिवस शिल्लक असताना २० जागा खिशात घातल्याने ते विजयापासून ४२ जागा दूर आहे. कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना ६६, तर भाजप ५६ जागा लढवत आहे. गेल्या निवडणुकीच्या कामगिरीवर जागावाटप झालेलं आहे. या ठिकाणा विरोधकांची ताकद अगदीच क्षीण झालेली आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते स्वबळावर लढण्यासाठी आग्रही होते. पण युतीचा निर्णय झाला. भाजपच्या वाट्याला कमी जागा आल्या. भाजप लढवत असलेल्या ५६ जागांपैकी १४ जागांवर पक्षानं विजय मिळवला आहे. त्यांचे उमेदवार बिनविरोध जिंकून आले आहेत. आतापर्यंत भाजपच्या रंजना पेणकर, आसावरी नवरे, मंदा पाटील, ज्योती पाटील, रेखा चौधरी, मुकुंद पेडणेकर, महेश पाटील, साई शेलार, दिपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, हर्षदा भोईर, डॉ. सुनीता पाटील, पूजा म्हात्रे, रवीना माळी असे १४ जण विजयी झाले आहेत. याचा अर्थ भाजपनं २५ टक्के जागा बिनविरोध जिंकलेल्या आहेत. साई शेलार सलग दुसऱ्यांदा बिनविरोध विजयी झाले आहेत.लीलीदुसरीकडे ६६ जागा लढवत असलेल्या शिंदेसेनेचे ६ जण बिनविरोध निवडून आले आहेत. शिंदेसेनेच्या रेश्मा निचळ, ज्योती मराठे, रमेश म्हात्रे, विधनाथ राणे, वृषाली जोशी आणि हर्षल मोरे असे ६ नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. बिनविरोध विजयी होण्यात शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट भाजपच्या तुलनेत कमी आहे.लीलीकल्याण-डोंबिवली शहर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं होमग्राऊंड आहे. इथे स्वबळावर लढून सत्ता खेचून आणण्याची तयारी त्यांनी केली होती. शहरात भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे चव्हाण स्वबळावर लढण्यासाठी प्रचंड आग्रही आहे. पण वरुन युतीचा निर्णय झाला आणि भाजपमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळाली. पण भाजपनं २५ टक्के उमेदवार बिनविरोध निवडून आणत मतदानाच्या १३ दिवस आधीच धुरळा केला आहे.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील सत्ताधारी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...
महापालिकेला फसविणाऱ्या...
अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
