भाजप पाठोपाठ शिंदेसेनेतही घराणेशाहीला प्राधान्य!
एकाच कुटूंबातील तीनहन अधिक सदस्यांना उमेदवारी देण्यात शिंदेसेनेची भाजपवर मात!
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवा या अहमिहकेपोटी राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना (शिंदे गट) या महायुतीमधील दोन पक्षांनी नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी मात्र आपपली वेगळी चुल मांडणे पसंत केले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेची यंदाची ही निवडणूक भाजप व शिवसेना (शिंदे गट) या दोन पक्षांमध्ये होणार असल्याने दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात विविध प्रभागांमध्ये तुल्यबळ असे उमेदवार दिले असल्याचे दिसून येते.
दरम्यान, भाजपने आपल्या उमेदवारांच्या यादीत एकाच कुटूंबातील दोन ते तीन जणांना पुन्हा उमेदवारी देवून एकप्रकारे घराणेशाहीला अभय दिलेले असतांनाच, एकेकाळी येथील भाजप नेतृत्वावर घराणेशाहीवरून टिकेची झोड उठविणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपचा कित्ता गिरवत, एकाच कुटूंबातील तीनहन अधिक सदस्यांना उमेदवारी दिली आहे. अशा उमेदवारांची ही संख्या जवळपास ३७ च्या घरात आहे. त्यामुळे एकाच कुटूंबातील तीनहून अधिक सदस्यांना उमेदवारी देण्यात शिंदेसेनेने भाजपवर मात केली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शिवसेनेतर्फे जाहीर केलेल्या १११ उमेदवारांमध्ये एकाच कुटूंबातील घरातील तीन ते चार सदस्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांच्या एकट्या घरात चौगुले यांच्यासह त्यांचे सुपुत्र ममित चौगुले, शुभम चौगुले व कन्या चांदणी चौगुले अशा चार जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच नुकतेच उबाठा शिवसेनेतून शिंदे सेनेत दाखल झालेल्या एम के मढवी यांच्या कुटूंबातील तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात स्वत: एम.के मढवी यांच्यासह त्यांची पत्नी विनया मढवी, स्नूषा तेजस्विनी मढवी यांचा समावेश आहे. चौगुले व मढवी यांची नवी मुंबईत बाहुबली व दबंग लोकप्रतिनिधी अशी प्रतिमा राहिली असल्याने उभयंतांना खूश करण्याचा प्रयत्न नेतृत्वाने एकप्रकारे केला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तर एकाच कुटूंबात उमेदवारीची खिरापत दिलेल्या अन्य उमेदवारांमध्ये सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, नेहा वास्कर, ऐश्वर्या सोनावणे, हेमांगिनी सोनावणे, नामदेव भगत यांच्यासह त्यांची पत्नी इंदुमती भगत, मंदाकिनी म्हात्रे व त्यांचे सुपुत्र अनिकेत म्हात्रे, घणसोलीचे प्रशांत पाटील व त्यांची पत्नी सुवर्णा पाटील, कोपरखैरण्याचे शिवराम पाटील व त्यांची पत्नी अनिता पाटील, प्रणाली लाड व त्यांची कन्या सोनवी लाड, कोपरीगावचे विलास भोईर व त्यांची पत्नी उषा भोईर, काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करत शिंदेसेनेत दाखल झालेले दत्ता घंगाळे व त्यांची पत्नी अश्विनी घंगाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तसेच तुर्भेत सुरेश कुलकर्णी, सुपुत्र महेश कुलकर्णी, अंबोली महेश कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे. यासह रंगनाथ औटी व त्यांची पत्नी शशिकला औटी यांच्यासह कविता आंगोडे, चंद्रकांत आंगोडे, कविता चंद्रकांत पाटील व चंद्रकांत रामदास पाटील यांच्यासह पुनन मिथुन पाटील व अमित रमेश पाटील अशा एकाच कुटूंबातील उमेदवारांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेची यंदाची ही निवडणूक २७ प्रभाग चार सदस्यीय व एक प्रभाग तीन सदस्यीय पॅनेल पध्दतीने होत आहे. दरम्यान, शिवसेनेतील एकाच कुटूंबातील तीन ते चार उमेदवारांव्यतिरिक्त इतर उमेदवार व त्यांचे प्रभाग पुढीलप्रमाणे- प्रभाग क्रं.१ अ अरूणा शिंदे, क जगदीश गवते, ड- रामआशिष यादव, प्रभाग क्रं.२ अ श्वेता काळे, क गौरी आंग्रे, प्रभाग क्रं.३ अ राजु कांबळे, ब वैशाली पाटील, ड आकाश मढवी, प्रभाग क्र. ब मनोज हळदणकर, प्रभाग क्रं.५ अ भक्ती केणी, प्रभाग क्रं.६ अ महेंद्र सावंत, सविता खुळात, क प्रज्ञा साष्टये, ड.गणेश दगडे, प्रभाग क्र.9 अ. अनिता मानवतकर, क चैताली भावेश पाटील, प्रभाग क्रं.८ अ.दशरथ जगताप, ब.रोहिनी व्दारकानाथ भोईर, प्रभाग क्र.९ ब दिपाली सकपाळ, क वैशाली म्हसकर, ड. सौरभ शिंदे, प्रभाग क्रं.१० अ विजयानंद माने, ब प्रियांका बिन्दे, क.प्राजक्ता जगताप, ड. वृषाली रविंद्र म्हात्रे, प्रभाग क्रं.११. अ.पोर्णिमा पाटील, क.दिपेश म्हात्रे, प्रभाग क्र. १२ अ.दिक्षा कचरे, ब.दमयंती आचरे, क.अलका धुमाळ, ड. राहूल पवार, प्रभाग क्र.१३ ब.शबाना खान, क.श्वेता म्हात्रे, ड. वैभव पाटील, प्रभाग क्र.१४ अ.सुशीला भोईर, ब.सविता सांगळे, क.शारदा सुळसकर, प्रभाग क्र.१६ सचिन नाईक, ब. माया पाटील, क. प्राजक्ता मोंडकर, ड. दर्शन भणगे, प्रभाग क्र.१७ अ.किशोर पाटकर, ड. दिव्या गायकवाड, प्रभाग क्र.१८ अ.सपना पाटील, ब.अनिषा देशमुख, क.श्रीकांत हिंदळकर, ड.कपूर संजय गुलशन मोहनलाल, प्रभाग क्र.१९ ड. अविनाश जाधव, प्रभाग क्र.२० अ.सविता लगाडे, प्रभाग क्र.२२ अ.रविंद्र सावंत, ब.साधना इंदोरे, प्रभाग क्र.२३ अ.सुजाता मांडवे, अश्विनी माने, क.दिलीप घोडेकर, ड. महादेव पवार, प्रभाग क्र.२४.ब.देवकी शिंदे, ड.काशिनाथ पवार, प्रभाग क्र.२५. महेंद्र नाईक, ब. सय्यद बानू, क.सुजाता गुरव, ड. कुणाल निरभवणे, प्रभाग क्र.२६.क.संजय म्हात्रे, ड.संदीप साळुंखे, प्रभाग क्र.२७ अ भारती कोळी, क.सरोज पाटील व प्रभाग क्र.२८ या तीन सदस्यीय प्रभागासाठी वंदना शिंदे, प्रियांका फोडे व जसपाल आटवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
