नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी सर्व यंत्रणेची सज्ञता!
नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी सर्व यंत्रणेची सज्ञता!
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची प्रक्रिया सुरु झाली असून दाखल उमेदवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया ३१ डिसेंबर रोजी पार पडली आहे. यापुढील काळात करावयाच्या निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा काल महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला. यावेळी निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक निरीक्षक तथा महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी सर्व विभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभाग अधिकारी यांना यापुढील कालावधीत करावयाच्या निवडणूकविषयक कामांबाबत मौलिक सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, निवडणूक उपआयुक्त भागवत डोईफोडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे आणि निवडणूकविषयक विविध बाबींसाठी नियुक्त नोडल अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी निवडणूक चिन्ह नेमून देणे, अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्दी, मतपत्रिका छपाई, मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण, पहिल्या प्रशिक्षणाच्या दिवशीच त्यांना माहितीपुस्तिका देणे, मतदान अधिकारी यांच्या मतदान केंद्रनिहाय नेमणूका, ईव्हीएम मशिन हाताळणी प्रशिक्षण, मतदान साहित्याची मतदान केंद्रनिहाय उपलब्धता, स्ट्रॉंग रुम व्यवस्था अशा विविध बाबींबाबत मौलिक मार्गदर्शन केले. सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी आणि उमेदवार यांना सर्व बाबींची नियमित माहिती देण्याचीही सूचना त्यांनी केली. मतमोजणी दुसऱ्याच दिवशी असल्याने त्यासाठी आवश्यक कर्मचारी यांच्या आतापासूनच नेमणूका करुन ठेवणे व त्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे ही कामे प्राधान्याने करावीत असे सूचित केले. यावेळी बहुसदस्यीय प्रभागासाठी पहिल्यांदाच मतदान होणार असल्याने मतदान प्रक्रियेची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रचार आणि प्रसार वाढवावा तसेच त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करावा अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. नवी मुंबईतील सर्व १०० टक्के मतदान केंद्रे वेबकास्टींग असतील त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
आपली सर्वच केंद्रे सीसीटिव्हीच्या निगराणीखाली असून त्यामधील संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताबाबत पोलीस यंत्रणेशी समन्वय राखण्याच्या सूचना करण्यात आल्या. प्रत्येक विभागात मॉडेल पोलींग स्टेशन असतील ती उत्तम करण्याकडेही विशेष लक्ष द्यावे, जाहिरातींसाठी जागा उपलब्धता तसेच मैदान उपलब्धता याबाबत सर्वांना समान संधी हे तत्व काटेकोरपणे अंगिकारावे तसेच जाहिरात फलकांवर जिओ टॅगींग पध्दत अंगिकारावी असेही आयुक्तांनी सूचित केले.
मतदान केंद्रे वॉटरप्रुफ करावीत
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी यावेळी कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक विभागातील एकूण मतदान केंद्रे व तेथील व्यवस्था यांची माहिती घेताना तात्पुरत्या स्वरुपात बनविण्यात येणारी मतदान केंद्रे काल पडलेला पाऊस पाहता वॉटरप्रुफ करावीत असे निर्देश त्यांनी दिले.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
