थर्टी फर्स्टनिमित्त पोलिसांची ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम... नवी मुंबईत २६६ तळीरामांवर कारवाई
थर्टी फर्स्टनिमित्त पोलिसांची ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम... नवी मुंबईत २६६ तळीरामांवर कारवाई
नवी मुंबई (प्रतिनिधी)- थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या मद्यपींविरोधात ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत पोलिसांनी कारवाईसाठी नवी मुंबईत विविध ठिकाणी सापळा लावला होता. नवी मुंबई पोलिसांकडून हाती घेण्यात आलेल्या या ड्रंक अँन्ड ड्राईव्ह'मोहिमेत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या एकूण २६६ तळीरामांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईसह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २३५७ वाहनचालकांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागतासह नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचे फलित म्हणून थर्टी फर्स्ट'च्या मध्यरात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नसल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी थर्टी फर्स्ट'च्या बंदोबस्तात तसेच नाकाबंदीदरम्यान मद्य पिऊन वाहन चालविणारे वाहनचालक आणि भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांची १ जानेवारी २०२६ रोजी पहाटेपर्यंत तपासणी केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळाले. विशेष म्हणजे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह सह पोलिस आयुक्त संजय ऐनापुरे यांनी स्वत: विविध ठिकाणी भेट देवून पाहणी करण्यासह पोलिसांना आवश्यक त्या सुचना प्रदान केल्या. तळीरामांवरील कारवाईबरोबरच वाहतूक पोलिसांकडून विना हेल्मेट दुचाकीवरून फिरणारे, सीटबेल्ट न लावता फिरणारे तसेच दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरणारे आदी प्रकार करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २३५७ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली आहे.
नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यात थर्टी फर्स्टनिमित्त नवी मुंबई वाहतूक विभागाच्या १६ युनिटकडून आपापल्या हद्दीत ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास राबविलेल्या ड्रंक अन्ड ड्राईव्ह'या विशेष मोहीमेत आढळून आलेल्या २६६ तळीरामांमध्ये वाशी वाहतूक शाखेच्या हद्दीत २४, एपीएमसी १५, रबाळे २०, महापे १३, कोपरखैरणे १७, तुर्भे-३२, सीवुडस् १३, सीबीडी १७, खारघर १४, कळंबोली २०, तळोजा १६, पनवेल शहर २२, नवीन पनवेल १०, उरण १३, न्हावा-शिवा १५ आणि गव्हाणफाटा ५ अशा एकूण २६६ तळीरामांचा समावेश आहे.
तळीरामांच्या संख्येत घट -
दरम्यान, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर वर्षाच्या अखेरच्या दिवशी मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई केली जाते व त्यानुसार यापूर्वी विविध वर्षांमध्ये केलेल्या कारवाईत हा आकडा साडेतीनशे पुढे राहिला आहे. मात्र यावेळेस तळीरामांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी केलेली जनजागृती आणि कडक बंदोबस्त हे प्रामुख्याने तळीरामांच्या संख्येत लक्षणीय घट होण्यामागील कारण असल्याचे बोलले जाते.
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
