बांधकाम विषयक मानक प्रणालीचे पुर्णत: पालन करा; अन्यथा कठोर कारवाई
बांधकाम विषयक मानक प्रणालीचे पुर्णत: पालन करा; अन्यथा कठोर कारवाई
पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांचा विकासकांना इशारा
पनवेल (वार्ताहर) - पनवेल मनपा हद्दीतील बांधकाम व्यावसायिकांसाठी महापालिकेने दिलेल्या सुचनांचे पुर्णत: पालन करावे, अन्यथा महापालिकेच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त मंगेश चितळे यांनी बांधकाम विकासकांना दिला आहे. पनवेल मनपा कार्यक्षेत्रात बांधकामांच्या ठिकाणी धूळ प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी महापालिका क्षेत्रातील बांधकाम व्यवसायिकांची महापालिका मुख्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त बोलत होते. (या बैठकिस अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, सहाय्यक नगररचनाकार केशव शिंदे, उपायुक्त स्वरूप खारगे,रचना सहाय्यक अनिकेत दुर्गावळे, मुख्य आरेखक नितीन हुद्दार उपस्थित होते.
वायु प्रदूषण नियंत्रणासाठी मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविण्यावर महापालिका भर देत आहे. हवा प्रदूषण, स्वच्छता , सुरक्षा व्यवस्था या संदर्भात महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम विकासकांनी योग्य ती काळजी घ्यावी, यासाठीच्या उपाय योजना विहीत काळात केल्या नाहीत तर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याच्या स्पष्ट सूचना या बैठकित आयुक्तांनी दिल्या.
बैठकीस एमपीसीबीसह एमआयडीसी अधिकाऱ्यांची दांडी; आयुक्तांची नाराजी
दरम्यान, महत्वाच्या अशा या आढावा बैठकीस यावेळी बांधकाम क्षेत्राशी निगडीत क्रिडाई, एमसीएचआय, बीएनएएम संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र यावेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व एमआयडीसीचे अधिकारी अनुपस्थितीत राहिल्याने आयुक्तांनी याबाबत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
