Breaking News

स्वच्छ सर्वेक्षणासाठी नियोजनबद्ध पध्दतीने काम करणे आवश्यक -आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

स्वच्छ सर्वेक्षणासाठी नियोजनबद्ध पध्दतीने काम करणे आवश्यक -आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

ठाणे (प्रतिनिधी)- स्वच्छ सर्वेक्षण हे केवळ गुणांकनापुरते मर्यादित नसून शहराच्या एकूण जीवनमानाशी निगडित आहे. घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा विलगीकरण, घराघरातून कचरा संकलन, सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था आणि कचरा प्रक्रिया या प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध व शिस्तबद्ध काम करणे आवश्यक आहे. नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे ओळखून क्षेत्रीय पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आयुक्त सौरभ राव यांनी काल झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५ करिता ठाणे महापालिकेतर्फे प्रभागसमितीनिहाय टास्क फोर्स स्थापन केला असून या टास्क फोर्सचे सदस्य म्हणून अंतर्गत नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. या नोडल अधिकाऱ्यांसाठी काल दि.३० डिसेंबर रोजी ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, मधुकर बोडके, दीपक झिंजाड, मिताली संचेती, अनघा कदम, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते.

नोडल अधिकाऱ्यांच्या क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमात आयुक्त सौरभ राव यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. शहर स्वच्छतेत गुणवत्ता, सातत्य आणि नागरिक सहभाग या तीन घटकांवर त्यांनी भर दिला. स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मधील नवीन मार्गदर्शक सूचना, गुणांकन पद्धती आणि मूल्यांकन निकष यांची सखोल माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. माहिती संकलन, दस्तऐवजीकरण, फोटो व जीपीएस आधारित नोंदी, तसेच ऑनलाईन प्रणालीवर अचूक व वेळेत माहिती अपलोड करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. कोणतीही माहिती अपूर्ण राहू नये यासाठी प्रत्येक घटकाची तपासणी करून कामकाज करावे, असे निर्देश त्यांनी दिले.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...