Breaking News

पथनाट्याच्या माध्यमातून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीतील मतदान प्रक्रियेचा व्यापक प्रचार

पथनाट्याच्या माध्यमातून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीतील मतदान प्रक्रियेचा व्यापक प्रचार

बेलापूर (वार्ताहर) - नवी मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने होत असून मतदारांनी कशा पध्दतीने मतदान करायचे याविषयी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये होर्डींग, बॅनर्स, डीजीटल होर्डींग, रिल्स, चित्रफिती, सोशल मिडीया अशा सर्वच माध्यमांव्दारे प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. यात मनोरंजनातून माहिती व प्रबोधन करणाऱ्या पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमाचाही उपयोग केला जात आहे. त्यानुसार मनपा क्षेत्रात दररोज विविध भागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी सकाळच्या सत्रात ५ व संध्याकाळच्या सत्रात ५ प्रयोग अशाप्रकारे दिवसभरात वेगवेगळया ठिकाणी १0 प्रयोग करण्यात येत आहे. त्यामधून निवडणूकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता आवाहन करण्यात येत आहे. या पथनाट्यांना नागरिकांचा ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद लाभत असून सोप्या पध्दतीने बहुसदस्यीय पध्दतीत मतदान कसे करायचे याची माहिती मिळत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



Most Popular News of this Week