नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता नियुक्त कर्मचाऱ्यांकरिता 1 जानेवारीपासून प्रशिक्षण कार्यक्रम
नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता नियुक्त कर्मचाऱ्यांकरिता 1 जानेवारीपासून प्रशिक्षण कार्यक्रम
नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025- 26 पारदर्शक रितीने व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रीयेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत असून महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 28 प्रभागांमधील 111 जागांकरिता 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होत असून महापालिका क्षेत्रात 1148 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी मा.राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने 8 विभागांसाठी 8 निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी 3 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच 180 क्षेत्रीय अधिकारी कार्यरत आहेत.
*निवडणूक प्रक्रिया सुनियोजित पध्दतीने पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, 3 सहाय्यक मतदान अधिकारी, शिपाई अशी पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारची राखीव पथकेही ठेवण्यात आली आहेत. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण 1 ते 7 जानेवारी या कालावधीत विष्णुदास भावे नाटयगृह वाशी आणि सरस्वती विद्यालय, ऐरोली येथे विभागनिहाय सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे.*
दि.1 जानेवारी रोजी नेरुळ विभाग, दि. 2 जानेवारी रोजी बेलापूर विभाग, दि.4 जानेवारी रोजी दिघा विभाग, दि.5 जानेवारी रोजी घणसोली विभाग, दि.6 जानेवारी रोजी दोन सत्रात कोपरखैरणे व तुर्भे विभाग, दि.7 जानेवारी रोजी वाशी विभागातील मतदान केंद्रांसाठी नेमलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे होणार आहे. तसेच दि.6 जानेवारी रोजी ऐरोली विभागातील मतदान केंद्रांसाठी नेमलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण सरस्वती विदयालय से.5 ऐरोली या ठिकाणी होणार आहे.
अशाच प्रकारे दुसऱ्या प्रशिक्षण वर्गाचेही दि. 8 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीतील वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, मतदान साहित्य तपासणी व वितरण, मतदार यादीचा वापर, मतदाराची ओळख पडताळणी, मॉकपोल प्रक्रिया, मतदान यंत्र सिलींग प्रक्रिया, कायदेशीर बाबी अशा निवडणूकीशी संबंधित विविध बाबींची माहिती देण्यात येणार असून विविध शंकांचे निरसनही केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ईव्हीएम मशीनची प्रत्यक्ष हाताळणी प्रात्यक्षिकही करुन घेतले जाणार आहे.
*प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक – गैरहजरांवर होणार कारवाई*
*निवडणूक प्रक्रिया पारदर्शक रितीने पार पाडण्यासाठी व कामकाजात कोणतीही त्रुटी राहू नये आणि गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले असून प्रशिक्षणाची तारीख, वेळ व ठिकाण याची माहिती संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी यांना स्वतंत्रपणे कळविण्यात आली आहे. या प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असून अनुपस्थित राहणाऱ्या व आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिलेला आहे.*
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
