Breaking News

ओल्या कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या खताला राज्य नोंदणीकृत हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड

ओल्या कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या खताला राज्य नोंदणीकृत हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड

नवी मुंबई महापालिकेस आणखी एक विशेष मानांकन...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - शहरात निर्माण होणारा ओला कचरा व सुका पालापाचोळा या विघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करुन तयार होणाऱ्या सेंद्रिय खताची विपणन व विक्री करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा हरित महासिटी कंपोस्ट हा अधिकृत व राज्य-नोंदणीकृत ब्रॅंड आहे. नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी ओल्या कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या खताच्या विपणन व विक्रीकरीता महाराष्ट्र शासनाचा हरित महासिटी कंपोस्टहा हरित ब्रॅड वापरण्यास परवानगी प्राप्त झालेली आहे. यामुळे देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीग” या विशेष कॅटेगरीत समाविष्ट असणाऱ्या नवी मुंबई शहराला महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक विशेष मानांकन लाभले आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी निर्माण होणारे सेंद्रिय खत त्या गुणवत्तेचे ठरले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या कचऱ्यापासून निर्माण होणारे खत हे आता हरित महासिटी कंपोस्टया विशेष ब्रँंडने ओळखले जाणार आहे. या ब्रॅडव्दारे उच्च दर्जाचे सेंद्रिय खत विक्रीसाठी उपलब्ध करून देता येणार असून, क्षेपणभूमीमध्ये जाणारा कचरा लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होत आहे. तसेच मातीची सुपिकता वाढवून, वनस्पतींचे आरोग्य सुधारण्यातून शा्वत शेतीला चालना मिळत आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे क्षेपणभूमी येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये नागरी घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन दैनंदिन सरासरी ३० ते ४० मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येत आहे. या सेंद्रिय खताचा वापर नवी मुंबई महापालिकेच्या उद्यानांमध्ये केला जात आहे. तसेच हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यातून शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक व गुणवत्तापूर्ण खताचा लाभ होत आहे.


Most Popular News of this Week