पूनर्विकासाच्या नावाखाली दडपशाही व मनमानी कारभार!
नेरुळमधील सायलेंट व्हॅली सोसायटी रहिवाशी आक्रमक
नेरूळ (वार्ताहर) - नेरुळमधील सायलेंट व्हॅली को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीत कमिटीतर्फे सोसायटीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. मात्र सोसायटीमधील असंख्य रहिवाश्यांना व सदस्यांना विश्वासात न घेता, कमिटी मनमानीपणाने पुनर्विकासाबाबत आपला कारभार करत असल्याचा आरोप करत, याविरोधात येथील रहिवाशी एकवटले असून काल त्यांनी कमिटीच्या कारभाराबाबत प्रसारमाध्यमांसमोर आपला संताप व्यक्त केला. या कमिटीचा कार्यकाळ संपल्यानंतरही कमिटीने नियमबाह्य निर्णय घेतले. याशिवाय प्रशासक नेमण्याऐवजी परस्पर निवडणूक घेवून कार्यकारणी नेमल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
सायलेंट व्हॅली को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीच्या पुनर्विकासाला आमचा विरोध नाही तर कमिटीतर्फे मनमानीपणा सुरु असलेल्या कामकाजाला आमचा विरोध असल्याची भूमिका यावेळी असंख्य रहिवाश्यांनी मांडली. आमचे घर आमचा अधिकार, सत्यमेव जयते...पुनर्विकास नेमका कुणाचा? अशा स्वरूपाचे फलक यावेळी असंख्य महिला व पुरुष सदस्यांनी आपल्या हाती घेत कमिटीच्या कारभाराचा निषेध नोंदविला. यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करतांना रहिवाश्यांनी सांगितले की, नियमानुसार सगळी कामे झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे मात्र सोसायटीची नियुक्त कमिटी ही सदस्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी रहिवाश्यांनी व्यक्त करत कमिटीविरोधात आपली नाराजी व्यक्त केली. पुनर्विकास प्रक्रियेत कमिटीतर्फे मनमानीपणा केला जात असून, सर्वांना सोबत घेवून पुनर्विकास करावा अशी मागणी केली. कमिटी मनमानीपणा करत असून कामामध्ये पारदर्शकता नाही. पुनर्विकास करतांना आम्हाला विश्वासात घेणे गरजेचे आहे. सर्वात आधी आम्हाला बँक गॅरंटी पाहिजे. पुनर्विकास करणाऱ्या विकासकाने ३० हजारांचे भाडे देण्यासह आगामी ३ वर्षाचे भाडे आमच्या बॅक खात्यात जमा करणे गरजेचे आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमच्या १८ सदस्यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. या सदस्यांचे शेअर सर्टिफिकेट दिले नाही. आम्ही सांगू त्याप्रमाणे ऐका तरच तुमचे शेअर सर्टिफिकेट देण्यात येईल अशाप्रकारे कमिटीचा मनमानीपणा सध्या सुरु असल्याचे सांगत, आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत अशी भावना असंख्य रहिवाश्यांनी व्यक्त केल्या. कार्यकारीणीकडून विश्वासघाताने कारभार केला जात आहे व त्याच्या विरोधात आम्ही न्यायासाठी एकवटलो आहोत. पुनर्विकासाला आमचा विरोध नाही. आम्ही खुश आहोत. मात्र त्याबाबतची आवश्यक ती माहिती आम्हाला मिळत नाही. १२० सदस्य आहेत. मात्र त्यातील काही सदस्यांना उद्या काय होणार याबाबतची माहिती नाही. उद्या अचानक घर तोडल्यास कुठे जाणार अशी समस्या आमच्यासमोर उभी ठाकली आहे. कमिटी कुठलीच माहिती न देता, आम्हाला अंधारात ठेवून कारभार करत असल्याचा आरोप यावेळी असंख्य रहिवाश्यांनी व्यक्त केला.
सोसायटीचे जे मेंबर्स आहेत जे सोसायटी चालवित आहे त्यांनी पुनर्विकासाचे काम पुढे आणले आहे. मात्र त्यांचा मनमानीपणा सुरू आहे. त्यामुळे सर्व रहिवाश्यांना व सदस्यांना विश्वासात घेवून टेंडर नोटीस काढणे गरजेचे आहे. दादागिरी कुणाची चालणार नाही असा इशारा यावेळी रहिवाशी महिलांनी दिला. सहकार मंत्री, सहकार न्यायालय, सहकार उपनिबंधक या सर्वांनी आमच्या बाजूने निर्णय देवूनसुध्दा कमिटी मेंबर्स सर्व यंत्रणांशी खेळत असून बिल्डरच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. पीएमसी (सल्लागार संस्था) सुध्दा याकडे गांभीर्याने बत नसल्याची रहिवाशांनी खंत व्यक्त केली.
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
