कल्याण डोंबिवली महापालिका यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज
३१ पॅनलमध्ये १५८३ मतदान केंद्रे, निवडणुकीसाठी ६१५२ कर्मचारी तैनात
कल्याण (वार्ताहर) - आगामी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले असून पालिकेच्या 3३१ पॅनल मधील निवडणूकी साठी १५८३ मतदान केंद्रे असणार आहेत. या निवडणुकीसाठी नऊ निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केली असून त्यांच्या मदतीला प्रत्येकी तीन सहाय्यक निवडणूक अधिकारी असणार आहेत.
प्रथमच या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी एकाच ठिकाणी न होता नऊ ठिकाणी मतदानाची मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, उपायुक्त समिर भूमकर, वंदना गुळवे, सचिव किशोर ठाकूर, संजय जाधव उपस्थित होते.
पालिकेच्या यंदाच्या निवडणुकीसाठी खर्चासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात १७ कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली असून या तरतुदींच्या निधीतून निवडणुकीचा खर्च केला जाणार आहे. पालिका क्षेत्रात एकूण १५ लाख ५१ लाख लोकसंख्या असून १२२ सदस्य निवडीसाठी चार सदस्यांचे २९ पॅनल व तीन सदस्यांचे दोन पॅनल असे ३१ पॅनल मधील १४ लाख २४ हजार ७४८ एकूण मतदार आहेत. या मध्ये पुरुष ७ लाख ४५ हजार ४७९, स्त्रिया ६ लाख ७८ हजार ७२६ व इतर ५५२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ३१ पॅनल मध्ये एकूण १५८३ मतदान केंद्र असणार आहेत. एका मतदान केंद्रावर चार अधिकारी कर्मचारी असे एकूण ६१५२ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. महापालिकेचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता राज्य सरकारच्या अन्य विभागातील कर्मचा री वर्ग पालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यरत असणार आहेत.
मंगळवार २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्या त्या विभागानुसार ९ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या इच्युक उमेदवारां सह विविध राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे, प्रचारसभा आदींसाठी परवानगी घेण्यासाठी महापालिकेकडून एक खिडकी योजना राबविली जाणार आहे. १५८३ मतदान केंद्राकरीता किती ईव्हीएम मशीन लागणार याचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून दिला जाणार आहे. त्यानुसार ईव्हीएम मशीन मागविली जाणार आहेत.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीत ८२ हजार ८५५ मतदारांची नावे दुबार आहेत. यात ४० हजार मतदारांची नावे मतदार यादीत दोन वेळा नमूद झाली आहे. ही दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आलेली नसून ही नावे मतदार यादीत कायम ठेवण्यात आली आहेत. दुबार मतदारांच्या नावे अंतिम मतदार यादीत चिन्हांकित करण्यात आली आहे. त्यांनी मतदार करताना एकवेळाच मतदार करीत असल्याचे डिक्लेरेशन द्यावे लागणार असल्याचे पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
