Breaking News

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर ठामपाचा भर.... चार दिवसांत शहरातील तब्बल ३७७८ अनधिकृत पोस्टर्स हटविले

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर ठामपाचा भर.... चार दिवसांत शहरातील तब्बल ३७७८ अनधिकृत पोस्टर्स हटविले

ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत जाहिराती, बॅनर्स व पोस्टर्स हटविण्याची मोहीम ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सुरू करण्यात आली. दि. १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ते दिनांक १८ डिसेंबर पर्यंत शहरातील एकूण ३७७८ अनधिकृत पोस्टर्स, भित्तीपत्रके व बॅनर्स हटविण्यात आले आहेत.

महापालिका निवडणूकीसाठी दि.१५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, त्या पार्थभूमीवर शहरात लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्या सूचनेनुसार सहायक आयुक्त सोपान भाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समित्यांमधील पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत अनधिकृत बॅनर्स, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होडिंग्ज, भित्तीपत्रके व पोस्टर्स हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींची नावे असलेल्या विकासकामांच्या कोनशीला झाकण्याची कार्यवाही महापालिकेच्यावतीने करण्यात आली.

दरम्यान, दि. १५ डिसेंबर ते दि. १८ डिसेंबर २०२५ या चार दिवसांच्या कालावधीदरम्यान ठाणे शहरातील ९ प्रभागसमितीमध्ये केलेल्या कारवाईमध्ये ६३० भित्तीपत्रके, ८९७ पोस्टर्स, ८३ कटआऊटस्‌, १२६६ बॅनर्स, ६०२ फ्लॅग अशा एकूण ३७७८ अनधिकृत जाहिराती हटविण्यात आल्या. यात नौपाडा-कोपरी प्रभाग समिती - ७५४, वागळे प्रभाग समिती - ५१२, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती - ५०८, वर्तकनगर प्रभाग समिती - ४८३, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती - ३२७, उथळसर प्रभाग समिती - ७०७, कळवा प्रभाग समिती - ७६, मुंब्रा प्रभाग समिती - १७९ व दिवा प्रभाग समिती-२३२ यांचा समावेश आहे.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...