Breaking News

नाताळच्या पार्श्वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई ३.३८ लाखांहून अधिकचा मद्यसाठा जप्त; एकास अटक

नाताळच्या पार्श्वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई ३.३८ लाखांहून अधिकचा मद्यसाठा जप्त; एकास अटक

पनवेल (वार्ताहर) - नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभागाने कारवाई करून एकूण ३ लाख ३८ हजार ३९०/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करून जयवंत भोईर (३८) नावाच्या इसमाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई राजेश देशमुख, संचालक, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई, प्रसाद सुर्वे, विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे प्रदीप पवार, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग रविकिरण कोले, यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभाग यांनी तळोजा पोलिस स्टेशन हद्दीत शिवम अपार्टमेंट से-१६, फेज २, घोटगाव रोडवर तळोजा येथे दारुबंदी गुन्ह्याकामी सापळा रचुन एका चारचाकी वाहनामध्ये बनावट विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या १४४ बाटल्या व ०१ चारचाकी वाहन असा एकूण २ लाख ५८ हजार १२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जयवंत भोईर नावाच्या इसमास ताब्यात घेत त्याच्याकडे सदर मद्याबाबत चौकशी केली असता, त्याने सदरचे मद्य हे जवळील फ्लॅटमधून आणले असे सांगितले व त्यानुसार सदरठिकाणी जाऊन छापा टाकून बनावट विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या २५० बाटल्या असा एकुण रू.८०,२७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर दोन्ही ठिकाणी मिळून एकूण ३ लाख ३८ हजार ३९०/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी जयवंत भोईर (३८)या याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

सदरची कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल ग्रामीण विभाग अनिल जी. बिराजदार, टुय्यम निरीक्षक बीट क्र. १- अजित बडदे, दुय्यम निरीक्षक बीट क्र.३ सुरेश झगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गैनिनाथ पालवे व इतर आदींच्या पथकाने केली आहे.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...