नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२५.. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द

नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२५.. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2025 प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द

 

मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र. रानिआ/मनपा-2025/प्र.क्र.41/का-5, दिनांक 09 डिसेंबर 2025 अन्वये 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांकरिता प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे.

त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 करिता प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या    दि. 15 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, संबंधित विभाग कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या https://www.nmmc.gov.in या संकेत स्थळावर आणि सोशल मिडीयावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

मा. राज्य निवडणूक आयोगाकडील पत्र क्र. रानिआ/जिपपस-2025/प्र.क्र.33/का-7, दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजीच्या पत्रान्वये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीकरिता मतदार यादीची प्रत (अंतिम मतदार यादी) (फोटोसह) प्रतिपृष्ठ रु. 2/- (रुपये दोन फक्त) इतका दर आकारून उपलब्ध करून देता येईल.

तसेच मतदारांकरीता नाव शोधण्याची (Voter Search) सुविधा मा. राज्य निवडणूक आयोगाच्या https://mahasecvoterlist.in/ वेबसाईटवर Search name in voter list या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, याची नोंद घेण्यात यावी. 


Most Popular News of this Week

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

११ जणांच्या मृत्यूनंतर...

कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...

नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...

| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...

खारघरमध्ये डेब्रीज खाली...

खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...