२४ व्या “नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो*चा शुभारंभ
नवी मुंबई (प्रतिनिधी) - क्रेडाई-बीएएनएमतर्फे २४ व्या “नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पोी-२०२५” वाशीमधील सिडको एविझबिशन सेंटर येथे १२ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उदघाटन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाला प्रसिध्द अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, माजी आमदार संदीप नाईक आणि इतर मान्यवरांनी भेट दिली. या प्रसंगी पालिकेचे सहाय्यक संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण, बीएएनएमचे अध्यक्ष रसिक चौहान, माजी अध्यक्ष वसंत भद्रा, उपाध्यक्ष ओमप्रकाश छाजेड, सेक्रेटरी जीगर त्रिवेदी, खजिनदार शैलेश पटेल, को-कन्वेनर महेश पटेल, हितेश गामी तसेच पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.
नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात निवासी, व्यावसायिक, टाऊनशिप आणि लक्झरी अशा विविध श्रेणींतील प्रकल्पामुळे गृह खरेदीदारांना एकाच छताखाली सर्व पर्याय उपलब्ध झाले आहेत. २० लाख रुपयांपासून पुढे घरे प्र्दशनात खरेदी करता येणार आहेत. १०० हून अधिक विकासकांचे ५०० पेक्षा अधिक गृहप्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. विमानतळाच्या संकल्पनेवर प्रॉपर्टी प्रर्शनात विकासकांनी स्टॉल मांडले आहेत. शहरातील वाढत्या पुनर्विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी १४ डिसेंबर रोजी गृहनिर्माण संस्थांसाठी पुनर्विकासावरील विशेष चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, नवी मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, तळोज-पनवेल रोड-वे, विरार-अलिबाग मल्टी-मॉडल कॉरिडॉर या दळणवळणाच्या साधनाने नवी मुंबई- पनवेल परिसरात घर घेणार्यांना भविष्यातील गुंतणूक करता येणार आहे. खारघरमध्ये भविष्यात होणारे हब, नैना प्रकल्प यामुळे विमानतळाच्या कुशीत गृह स्वप्नपूर्ती, गुंतवणूकदार आणि विकासकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
-रसिक चौहान, अध्यक्ष: क्रेडाई-बीएएनएम,नवी मुंबई
