जुईनगर रेल्वे स्थानकासमोरील हत्या प्रकरणाची गुन्हेशाखेकडून उकल; आरोपी अटकेत
जुईनगर रेल्वे स्थानकासमोरील हत्या प्रकरणाची गुन्हेशाखेकडून उकल; आरोपी अटकेत
पत्नीसोबत गैरप्रकार केल्यावरून दगडाने ठेचून केली हत्या
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई गुन्हेशाखा कक्ष-१ पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जुईनगर रेल्वे स्टेशन समोरील सुकलेल्या नाल्यामध्ये एका कचरावेचक तरूणाच्या झालेल्या हत्या प्रकरणाचा गुन्हा उघडकीस आणत, याप्रकरणी एका आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. राजु जब्बर मंडल(२७), सध्या रा. जुईनगर पार्किंग जवळील झोपडपट्टी डी मार्ट समोर से-१० सानपाडा, मुळ रा. ह॒गळी पश्चिम बंगाल असे याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर हत्या झालेल्या तरूणाचे नाव कादीर करन हसेन शेख उर्फ लखा उर्फ लंबू (२५) रा. मंडाला मानखुर्द मुंबई असे आहे. दरम्यान, यातील मृत तरूण कादीर करम हुसेन शेख याने आरोपी राजु मंडल याच्या पत्नीसोबत गैरप्रकार केला होता. या कारणावरून संतप्त झालेल्या राजू मंडल याने कादीर करन हसेन शेख याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची आरोपी राजु मंडल याने पोलिसांसमोर कबूल केले आहे.
याबाबत हकीकत अशी की, गत महिन्यात दि.२० नोव्हेंबर २०२५ रोजी जुईनगर रेल्वे स्टेशनसमोरील सुकलेल्या नाल्यामध्ये एक अंदाजे २५ ते ३० वयोगटातील तरूण जखमी अवस्थेमुळे बेशुध्द स्थितीत नेरूळ पोलिसांना मिळुन आला होता. त्यास पोलीसांनी उपचाराकामी मनपा हॉस्पीटल, वाशी येथे दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले होते. याबाबत नेरूळ पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र सदर गंभीर गुन्हयातील अनोळखी मयत व अज्ञात आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा सचिन गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अजयकुमार लांडगे यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शाखा, कक्ष-१ वाशी, येथील अधिकारी व अंमलदार यांची ३ वेगवेगळी पथके तयार केली होती. या तपास पथकाने गुन्हयाचे घटनास्थळ व परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यासह इतर बाबींने तपास केला असता, मृत तरूण हा कचरा वेचक असल्याचे तसेच त्याला दारू पिण्याचे व व्हाईटनर ओढण्याचे व्यसन असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर जुईनगर परिसरातील कचरा वेचक इसम व दारू दुकानामध्ये जावून पोलिसांनी चौकशी केली असता, सदर चौकशीमध्ये मृत तरूण कादीर हुसेन शेख व आरोपी राजु मंडल या दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी आरोपी राजु मंडल यास ताब्यात घेवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, कादीर करम हुसेन शेख याने माझ्या पत्नीसोबत गैरप्रकार केल्यामुळे रागाच्या भरात, कादीर शेख याच्या डोक्यावर दगडाने आघात करून त्याची हत्या केली असल्याचे आरोपी राजु मंडल याने कबुल केले आहे. या घटनेप्रकरणी सुरुवातीला नेरूळ पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र सदरचे हे प्रकरण हत्याचे असल्याचे व यातील आरोपी निष्पन्न झाल्याने आरोपी राजु मंडल याविरोधात नेरूळ पोलीस ठाणे येथे बी.एन.एस. कलम १०३(९) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बनकर, अनंत लांब, पीएसआय अभय काकड, पीएसआय प्रदिप बोरुडे, पोलिस हवालदार चंद्रकांत कदम, अझहर मिर्झा,सचिन पाटील आदींच्या पथकाने सदरची ही कामगिरी पार पाडली आहे.
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
