केडीएमसी उपायुक्त संजय जाधव यांची उचलबांगडी
उपायुक्त पदाचा कार्यभार काढून आणले मूळपदावर
कल्याण(वार्ताहर)- कल्याण डोंबिवली महापालिका उपायुक्त संजय जाधव यांची प्रशासनाने उचलबांगडी करत त्यांच्याकडील उपायुक्त पदाचा कार्यभार काढून घेत त्यांची मूळ तांत्रिक विभागात वर्णी लावण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.केडीएमसीतील तांत्रिक विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला प्रशासकीय सेवेत अतिरिक्त पदासह उपायुक्त पदाचा पदभार देता येतो असा राज्य सरकारचा निर्णय आहे. अतिरिक्त पदभार सोपविताना सहा महिन्यापेक्षा जास्त काळ सोपविताना सरकारची परवानगी घ्यावी लागते. असे असताना मात्र महापालिका प्रशासनाने सरकारकडून कोणतीच परवानगी घेतलेली नसल्याचा गंभीर प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित झाल्याने पालिका प्रशासनाने संजय जाधव यांच्याकडे सोपविण्यात आलेला उपायुक्त पदाचा कार्यभार काढून घेतला आहे. जाधव यांच्याकडील उपायुक्त पद काढून घेतल्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी काढले आहेत. संजय जाधव यांची उचलबांगडी करून त्यांना मूळ तांत्रिक विभागात आणण्यात आले आहे. पालिकेचे अधिकारी संजय जाधव यांचे पद हे मुख्य उद्यान अधीक्षकाचे आहे. हे पद तांत्रिक पद असताना त्यांच्याकडे अतिरिक्त पदाचा आणि उपायुक्त पदाचा पदभार देता येत नाही अशी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यानंतर जाधव यांच्याकडील उपायुक्त पदाचा पदभार काढून घेत, त्यांना त्यांच्या मूळ पदावर ठेवण्यात आले आहे. तांत्रिक पद असलेल्या अधिकाऱ्यास अतिरिक्त पदभार देता येत नाही असा राज्य सरकारचा निर्णय आहे. अतिरिक्त पदभार दिला तरी तो सहा महिन्यापेक्षा जास्त काळ देता येत नाही. त्यानंतर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. सरकारकडून महापालिकेने परवानगी घेतलेली नाही. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. यापूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनीही या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार करुन पत्र व्यवहार केला होता. त्या पश्चात काल हिवाळी अधिवेशनात आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर जाधव यांच्याकडील उपायुक्त पदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे.
अतिरिक्त पदभार सोपविला अन्य अधिकाऱ्यांवर...
केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी जाधव यांच्याकडील अतिरिक्त पदभार अन्य अधिकाऱ्यांवर सोपविले आहे. त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा पदभार कर विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, माहिती जनसंपर्क विभागाचा पदभार उपायुक्त वंदना गुळवे, शिक्षण क्रिडा सांस्कृतिक विभागाचा पदभार उपायुक्त प्रसाद बोरकर आणि समाज विकास विभागाचा पदभार उपायुक्त कांचन गायकवाड यांच्याकडे सोपविला आहे. उपरोक्त सर्व विभागाचा अतिरिक्त पदभार जाधव यांच्याकडे होता.
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
