Breaking News

गाळ्यासमोरील मार्जिनल स्पेसच्या गैरवापरासह अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका

गाळ्यासमोरील मार्जिनल स्पेसच्या गैरवापरासह अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागामार्फत मार्जिनल स्पेसचा बेकायदेशीर वापर करण्याऱ्यांविरोधात सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार काल बेलापूर विभागाप्रमाणेच वाशी विभागामध्ये से-१७, से-२ परिसरात मार्जिनल स्पेसचा गैरवापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात धडक मोहीम राबवून त्यांचे साहित्य जप्त करून ते कोपरखैरणे येथे जमा करण्यात आले.

वाशी प्रमाणेच एपीएमसी मार्केट परिसरात से-१९ येथेही कारवाई करण्यात येऊन त्याठिकाणीही मार्जिनल स्पेसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे सामान जप्त केले. या मोहीमेमध्ये १ लाख ५५ हजार इतकी दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली. त्यासोबतच वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व विभागांमध्ये विनापरवानगी बॅनर्स हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रांमध्ये अतिरिक्त आयुक्त डॉ राहुल गेठे व अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांचे मार्गदर्शनखाली नागरिकांना रस्ते व पदपथ चालण्यासाठी खुले असावेत याकरिता अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे याप्रमाणेच मार्जिनल स्पेसचा वापर करणाऱ्यांविरोधात व अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...