कामगारांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी वंचितचे नमुंमपा मुख्यालयासमोर आंदोलन
कामगारांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी वंचितचे नमुंमपा मुख्यालयासमोर आंदोलन
बेलापूर (वार्ताहर) - नागरिकांच्या व कामगारांच्या विविध प्रलंबीत मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता व्हावी यासाठी नवीमुंबई महापालिका मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनतर्फे उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे बेलापूर तालुकाध्यक्ष अँड. उमेश हातेकर व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन भोईर यांनी संयुक्त रित्या नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर नागरिकांच्या व कामगारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सदरचे उपोषण आंदोलन सुरू केले आहे. यात प्रामुख्याने समान काम समान वेतन लागू करावे, सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युटी मिळावी, सर्व कंत्राटी कामगारांचे वेतन महिन्याच्या ७ तारखेच्या आत मिळावे, घनकचरा विभागातील अतिरिक्त सुपरवायझर कमी करावेत, समाज विकास अंतर्गत ग्रंथालयात काम करणाऱ्या कामगारांना तसेच उद्यान विभागातील सफाई कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन द्यावे, घनकचरा विभागातील कचरा वाहतूक गाड्यांची संख्या कमी असल्याने कामगारांची पिवणूक होत आहे ते ताबडतोब थांबवून कचरा वाहतूक गाड्यांची संख्या वाढवावी, पामबीच रस्त्यावर यांत्रिकी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना किमान वेतना प्रमाणे पगार मिळावा, माँ साहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक यांना निलंबित करावे तसेच संबंधित कंत्राटदाराला पालिकेच्या काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, करावे गावातील २ वर्षांपासून बंद असलेले सार्वजनिक शौचालय नवीन बांधावे व समाज विकास विभाग अंतर्गत मागासवर्गीयाच्या आर्थिक उन्नतीसाठी देण्यात येणाऱ्या योजना ताबडतोब द्याव्या अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.
Most Popular News of this Week
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
११ जणांच्या मृत्यूनंतर...
कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
