शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री तात्काळ बंद करा!
आ.प्रशांत ठाकूर यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांकडून निर्देश
पनवेल (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा तसेच अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. नियमांनुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात अशा पदार्थांची विक्री संपूर्णपणे बंदीस्त आहे. मात्र, अनेक ठिकाणी टपऱ्या आणि स्टॉल्सद्रारे या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले असून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शाळा- महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी करतानाच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
ताराकिंत प्रश्नाद्रारे गुटखा व अंमली पदार्थ विक्रीचा गंभीर प्रश्न आ.प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला होता. या प्रश्नाच्या अनुषंगाने विधिमंडळाच्या सभागृहात आ.प्रशांत ठाकूर यांनी सदरचा विषय मांडत शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले. सदरच्या प्रश्नावर बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले कि, गुटखा आणि अंमली पदार्थाची विक्री विद्यालयांच्या परिसरातील टपरी दुकानांवर सर्रासपणे होत असल्याची तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत. या प्रश्नाच्या अनुषंगाने लेखी उत्तरात शाळा महाविद्यालय १०० मीटर परिसरामध्ये गुटखा तंबाखू सिगारेट विक्री करणाऱ्या टपरी, जनरल स्टोअर्स, किराणा दुकान यांचे अतिक्रमण काढण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासोबत पोलीस ठाणे प्रभारी यांनी पत्रव्यवहार करावा आणि संयुक्त कारवाई पथक नियुक्त करण्यात आलेली आहेत, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. मात्र जर अशी पथके नियुक्त केली आहेत तर लोकप्रतिनिधींना त्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे प्रत्यक्षरित्या हा आदेश झाला असेल तर त्याची अमंलबजावणी कधी होणार आणि असे पथक नियुक्त केले असेल, तर त्याची माहिती अधिकार फलकाप्रमाणे शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये लावण्याची आवश्यकता आहे आणि तक्रार केल्यानंतरही गुटखा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्या दुकानांना हटवले जाणार नसेल तर त्या पथकाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली. आणि या सर्व बाबीतून गुटखा व अंमली पदार्थ विक्रीचा महत्वपूर्ण विषय राज्य शासन दरबारी मांडून शासनाचे लक्ष केंद्रित केले.
गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी याबाबत उत्तर देताना सभागृहात सांगितले कि, गुटख्यावर बंदी असतानाही काही ठिकाणी अवैध विक्री होते. त्या संदर्भात पोलिसांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आणि त्यानुसार गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शाळा महाविद्यालयांच्या परिसरातील पोलीस प्रशासनाने या टपरी दुकाने उध्वस्त करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्याचबरोबर या संदर्भात लोकप्रतिनिधींना माहिती देण्याकरिता तातडीने त्यांच्या ठिकाणच्या पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना निर्देश देऊन तशी माहिती देण्यात येईल, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना, गुटखा विक्रीवर कडक कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी निर्देश दिले असल्याचे सांगून त्या अनुषंगाने कारवाई करण्यासंदर्भात कायद्यात काही बदल करावे लागले तरी ते केले जातील, असे आश्वासित केले.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...
