Breaking News

महिलांच्या सुरक्षेसाठी “लाइफ सायकल अप्रोच' आवश्यक -केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल

महिलांच्या सुरक्षेसाठी “लाइफ सायकल अप्रोच' आवश्यक -केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल

कल्याण (वार्ताहर) - महिलेच्या जन्मापासून ते तिच्या जीवनाच्या अखेरपर्यंत तिचे सर्वांगीण रक्षण आणि सक्षमीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य, पोषण, शिक्षण, युवा, विवाह, कार्यस्थळ, तसेच ज्येष्ठ नागरिक म्हणून प्रत्येक टप्प्यावर महिलांचे संरक्षण आणि सन्मान अबाधित राखला गेला पाहिजे, असे सांगत समाजामध्ये महिलांसाठी “लाईफ सायकल अप्रोच” विकसित होण्याची आवश्यकता केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केली. ईनरव्हील क्लब ऑफ झोन ६(डिस्ट्रिक्ट ३१४) महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या युनाइट अँड ऑरेंज कार्यक्रमात ते बोलत होते.

कल्याण पश्चिमेतील सिटी पार्कमधील अँम्फी थिएटर परिसरात झालेल्या या कार्यकमाला महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती. महिलांच्या स्वसंरक्षणासाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी केडीएमसी आणि इनर व्हील क्लबच्या संयुक्त प्रयत्नातून या उपक्रमाला गती देण्याचे आवाहन केले. पुरुषांचे महिलांवरील वाढते शारीरिक अत्याचार हा वाढता विषय बनलेला असतानाच दुसरीकडे महिलांचेच महिलांवरील मानसिक अत्याचाराकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही असे परखड मत ईनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन लक्ष्मी सिंग यांनी व्यक्त केले.

आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला पहिल्याच वेळी आपण सर्व शक्तिनिशी जोरदार प्रतिकार केला तर कोणत्याही व्यक्तीची पुन्हा आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही, अशा शब्दांत खडकपाडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली दांगट यांनी महिलाना आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लबच्या प्रोजेक्ट चेअरमन डॉ. संध्या भट, अध्यक्ष डॉ. तृप्ती बोबडे, प्रोजेक्ट को ऑर्डिनेटर काजोल खतवानी यांच्यासह इनरव्हील्स क्लबच्या विविध शहरातील महिला सदस्यांनीही विशेष सहकार्य केले.


Most Popular News of this Week

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...